You are currently viewing शिशिर

शिशिर

*ज्येष्ठ गझलकारा प्रा.सुनंदामाई पाटील “गझलनंदा” लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*शिशिर*

 

झाड पिकल्या पानांचे जणु वृध्द घरट्यात

थोडे ऊन थोडी थंडी झाड सोसे शिशिरात

 

झाली पानगळ सारी जमे बुंध्यापाशी रास

एक वृद्धाश्रम भासे पान पिवळी आरास

 

आली वाऱ्याची झुळुक झोका फांदीस देताना

झाड रडले मुक्याने त्याचे पान गळताना

 

आहे शाप जन्मजात पान पिवळे गळावे

वसंताच्या चाहुलीने नवे अंकुर फुटावे

 

पान पान गळताना होई वेदना झाडास

प्रेम शिशिराच्या ठायी जरी येतो मधुमास

 

वर्षा अखेर फाल्गुन आयुष्याच्या शेवटास

कसे सोडावे फांदीस जगण्याचा अट्टाहास

 

पाना निरोप देताना रडू शिशिरास आले

पान पिवळे जाळीचे कसे वादळी उडाले

 

बाळलेणे सजवले निसर्गाच्या सोनाराने

मऊ लालस पानांनी झाड सजे आनंदाने

 

नको दुःखाचे उमाळे आली शिशिराची कळा

पानगळ भूतकाळ दिव्य वसंतसोहळा

 

*प्रा. सुनंदा पाटील*

८४२२०८९६६६

प्रतिक्रिया व्यक्त करा