You are currently viewing “पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना”चे लाभ घेण्याचे आवाहन

“पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना”चे लाभ घेण्याचे आवाहन

“पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना”चे लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

 सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी “पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना” राबविण्यास शासनाने मान्यता दिली असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी १० मार्च २०२६ पर्यंत ऑनलाईन पद्धीने अर्ज सादर करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक उदयसिंह गायकवाड, यांनी केले आहे.

 सिंधुदुर्ग जिल्हा ठिकाणातील सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आणि विषेश मागास प्रवर्गातील भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ” पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना” राबविण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. या पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सन २०२५-२६ योजनेकरिता विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेषमागास प्रवर्गातील १२ वी नंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमात तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रथम, व्दितीय, तृतीय व चतुर्थ वर्षातील प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विदयार्थ्यांनीच ऑनलाईन पध्दतीने दि.२५ फेब्रुवारी ते दि.१० मार्च २०२६ पर्यंत https://hmas.mahait.org  या संकेतस्थळावर जावून अर्ज भरावयाचे आहेत.

भरलेल्या अर्जाची एक प्रत सहायक सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सिंधुदुर्गनगरी ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग यांच्याकडे जमा करावयाचे आहे. या योजनेअंतर्गत सन २०२५-२६ साठी विद्यार्थ्यांना पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा