*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
एक तरी मित्र असावा..
दिवसभर असते
पोटासाठी मरमर
कळतं नाही कुठे घालवावे
दोन क्षण घडीभर
कोणी होत नाही मित्र
लागत नाही लळा
कुणातही दिसत नाही
आपलेपणाचा जिव्हाळा
जो तो जगण्यासाठी
धावपळीत असतो
मैत्रीसाठी कुणाचाही हात
पुढे होत नसतो
मित्र नाही म्हणून
व्यक्त होता येत नाही
मित्राशिवाय माणसाचं
जगणं पुर्ण होत नाही
एकटेपण घालवायला
मित्रासारख औषध नसतं
निरोगी जगायला मात्र
मित्रच एक विश्व असतं
पण आता माणसं बदललीत
कोणी कुणाचं होत नाही
मित्र असल्याशिवाय
एकटं राहवत नाही
म्हणून काहीजरी नसलं तरी
एकतरी असा मित्र असावा
की त्याच्याच खांद्यावरवरती
अखेरचा प्रवास व्हावा
*संजय धनगव्हाळ*
*अर्थात कुसुमाई*
