अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाकडून २५ हजारांची मदत
मालवण / (तळाशील) :
मालवण तालुक्यातील तळाशील येथील तेरेकर रापण संघाच्या बोटीला तसेच कावणाच्या साहित्याला आग लागून मोठे आर्थिक नुकसान झाले. या दुर्घटनेत मासेमारीसाठी वापरली जाणारी बोट आणि साहित्य जळाल्याने संबंधित कुटुंबास मोठा आर्थिक फटका बसला आहे.
या घटनेची दखल घेत अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाने तत्काळ मदतीचा हात पुढे केला. महासंघाच्या वतीने रुपये २५,०००/- इतका सहाय निधी नुकसानग्रस्तांना सुपूर्द करण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष श्री. परशुराम उपरकर, जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रशेखर उपरकर, श्री. हरीशचंद्र खोबरेकर, श्री. दिलीप घारे, महासंघाचे कार्याध्यक्ष श्री. रतनकुमार झाजम, श्री. बाबी जोगी, श्री. सुदेश आचरेकर, श्री. सहदेव बापर्डेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी नुकसानग्रस्तांना धीर देत समाज एकजुटीने त्यांच्या पाठीशी उभा राहील, असा विश्वास व्यक्त केला.
