फोंडाघाटात मुसळधार पावसाने वाहतूक विस्कळीत
फोंडाघाट, ता. कणकवली
फोंडाघाट घाट परिसरात अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. दुपारी सुमारे दोन ते तीन तास कोसळलेल्या पावसामुळे वाहनचालकांना गाडी चालवताना तारेवरची कसरत करावी लागली.
घाटातील वळणदार रस्ते आणि कमी झालेली दृश्यमानता यामुळे वाहनांची गती मंदावली होती. काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अचानक आलेल्या या पावसामुळे स्थानिकांसह प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली.
दिवसभर परिसरात पावसाळी वातावरणासोबत उन्हाळ्याचीही जाणीव होत होती. मात्र सायंकाळच्या सुमारास आलेल्या वळवाच्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आणि तापमानात किंचित घट झाली. या दरम्यान काही काळ वीजपुरवठाही खंडित झाला होता.
स्थानिक प्रशासनाने नागरिकांना घाट परिसरातून प्रवास करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
प्रतिनिधी – अजित नाडकर्णी, शुभांजित श्रुष्टी
