You are currently viewing आयुष्याची भूमिती

आयुष्याची भूमिती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्ज्वला सहस्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आयुष्याची भूमिती*

(अष्टाक्षरी)

 

आयुष्याच्या गणितात,

एक भाग तो भूमिती!

अवघड ती प्रमेयं ,

काठीण्याची ये प्रचिती!…१

 

समानता हीच संधी,

त्रिकोणाची सुसंगती !

दोन त्रिकोण समान ,

घेत लक्ष ते जोडती !…२

 

वर्तुळाची त्रिज्या जीवा,

दोन्ही दाखवी वर्तुळ !

होते संसार करता,

प्रत्येकाची तारांबळ !….३

 

दोन्ही त्रिकोण चौकोन,

मध्यबिंदू शोधताना !

क्षेत्रफळ ते मापती ,

अंतरास जोडताना !….४

 

माया, प्रेम नातेबिंदू,

चौकोनात ते असती !

त्यांची जागा पाहताना,

गुंग होई माझी मती !….५

 

आयुष्याची ही भूमिती,

होती जरी किचकट !

जिद्दी मनाने खेळला,

संसाराचा सारीपट !….६

 

उज्वला सहस्रबुद्धे, पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा