You are currently viewing अप्रतिम गीतांचा अविष्कार

अप्रतिम गीतांचा अविष्कार

 

ॲड.रुपेश पवार यांना आपण साहित्यिक, पत्रकार, संयोजक, आयोजक आणि गरज पडली तर सूत्रसंचालक या भूमिकेतून पाहिले आहे. यातून त्यांनी आपली दहा पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. असे हे चौफेर आयामी व्यक्तिमत्व आहे. या व्यक्तिमत्त्वाने आज साहित्य, पत्रकारिता या बाहेरही आपले कार्य सुरू केले आहे. ते नाट्य, चित्रपटा करता कथा, पटकथा संवाद लिहितात. २०१८ साली त्यांनी चित्रपट लिखाणाला सुरुवात केली परंतु २०२० च्या भारतातील लॉक डाऊनमुळे त्यांचे हे प्रोजेक्ट बंद पडले. त्या आधी त्यांनी कौटुंबिक, सामाजिक पार्श्वभूमीचे एक नाटक ही लिहिले होते. या नाटकाचे दिग्दर्शक प्रमोद पगारे हे रुपेश यांचे मित्र होते पण नोटाबंदीच्या काळात ते नाटक अडकले. या सर्व गोष्टी झाल्यावर रुपेश पवार यांनी आता वेब सिरीज आणि शॉर्टफिल्मकडे आपला मोर्चा वळवला आहे.

हे सर्व करत असताना त्यांनी आपल्या तीन गाण्यांना वेगवेगळ्या चॅनेलवर रिलीज केले आहे. हा त्यांच्या गाण्यांचा प्रवास खूपच रोचक आहे. २०२५ च्या ३१ मार्च या दिवशी त्यांनी आपले मराठी गाणे “ही सांज” हे चित्रीकरण करून रिलीज केले. हे गाणे त्यांनी २०१६ मध्ये रेकॉर्डिंग केले होते. अंध गायिका अश्विनी देशपांडे यांनी या गाण्याला आपले स्वर दिले होते. अंध संगीतकार रवी पोवळे यांनी संगीत साज चढवला होता. स्वतः रुपेश पवार हे अपंग आहेत त्यामुळे हा प्रोजेक्ट दिव्यांगांचा प्रोजेक्ट होता. काही कारणामुळे तेव्हा या गाण्याचे चित्रीकरण पूर्ण होऊ शकले नाही. मग २०२५ ला रुपेश पवार यांनी हे गाणे चित्रीकरण करून रिलीज केले. दिग्दर्शक अभिजीत हरळीकर यांच्या “FEST Entertainment”या चॅनेलवर हे गाणे रिलीज झाले. या गाण्यात प्रेयसीचा नववधू होण्यापर्यंतचा एक छान भावनिक प्रवास आहे. लग्न होणाऱ्या नवजोडप्याने यात आपला अभिनय साकारला आहे. उत्तम संगीत व रुपेश पवार यांची अप्रतिम शब्दरचना, यामुळे हे गाणे लोकांच्या मनापर्यंत पोहोचते. हे गाणे रिलीज झाल्यानंतर रुपेश पवार आणि अभिजीत यांना नवा सूर गवसला मग त्यांनी हिंदी गाण्याकडे आपले लक्ष केंद्रित केले.

हे हिंदी गाणे २० जून २०२५ रोजी “SR Creation” या चॅनेलवर रिलीज झाले. हे गाणे रुपेश, अभिजीत यांनी स्वतःसाठी बनवून ठेवले होते परंतु समोरून दोन कलाकारांनी त्यांना सांगितले हे गाणे आम्हाला आमच्या अभिनयाकरता हवे आहे. ते दोन कलाकार या चित्रीकरणाचे निर्माते झाले आणि अभिजीत सरांनी दिग्दर्शक म्हणून उत्तम कथानक तयार करून चित्रीकरण यथायोग्य केले. प्रियकर, प्रेयसीच्या प्रेमात काही कारणाने खंड पडला, त्यानंतर ते बऱ्याच दिवसांनी अचानक समोर आले. मग त्यांचे प्रेम, प्रेम भावनेच्या लाठांवर आरुढ

होऊन यशस्वी झाले. अशी याची चित्रीत कथा आहे. या गाण्याची प्रेरणा ९० च्या दशकातील गाण्यांमधून घेतली गेली पण आजच्या काळातले गाणे रुपेश अभिजीत सरांनी बनवले. दोन मराठी माणसांनी हिंदी, उर्दूचा छान वापर करून हे गाणे सुंदररित्या प्रेझेंट केले. हे या गाण्याचे वैशिष्ट्य आहे. असंख्य संगीत प्रेमी प्रेक्षक वर्गाने या गाण्याला उचलून धरले. हे गाणे समोर आले, की सहज ते गाणे गायले जाते. अशा प्रकारे “तेरा मेरा साथ रहे” हे गाणे लोकप्रिय झाले आहे.

यानंतर रुपेश पवार यांनी आपल्या जन्मदिनी १३ डिसेंबर २०२५ रोजी “असा हा मोहे गारवा” हे गाणे चैतन्य मराठी म्युझिक या स्वतःच्या चॅनेलवर रिलीज केले. रुपेश पवार यांनी २००३ सालात ही कविता लिहिली होती पण २०२५ च्या नोव्हेंबर महिन्यात अभिजीत सरांनी अचानक एक थंडीवरचे गाणे रुपेश सरांकडे मागितले. मग रुपेश पवार यांनी या कवितेचे गाणे करत, अतिशय सुंदर शब्दरचना केली. पहाटेचे वर्णन या गाण्यात केले गेले आहे. यावेळी धुक्याची चादर सर्वत्र पसरलेली असते. आनंददायी वातावरण सभवताली असते. या सर्व गोष्टींचे यथार्थ आणि पावन वर्णन रुपेश पवार या गीतकाराने केले आहे. “गारवा अल्बम” ची आठवण आपल्याला या गाण्यातून येते. अशा प्रकारचे हे गाणे लिहिले गेले आहे. पुन्हा एकदा अभिजीत सरांनी या गाण्याची निर्मिती केली आणि चित्रीकरण अप्रतिम केले. हे मोहमयी गाणे सुषमा कुलकर्णी यांनी गायले आहे. हे गाणे रुपेश पवार यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभात रिलीज झाले. त्या समारंभाचे मी सूत्रसंचालन केले होते.

रुपेश पवार आणि माझी भेट २०२४ ला एका कार्यक्रमा दरम्यान झाली. बघता बघता २०२५ या वर्षी रुपेश पवार यांनी ही सुरांची जादू घडवली.

ते पाहून माझे मन हरकून गेले. साहित्यिक गप्पा मारणारे रुपेश पवार अचानक गीत क्षेत्रात जाऊन यशस्वी झाले. ही माझ्यासाठी आश्चर्यकारक घटना होती. एक दिव्यांग माणूस आपल्या अंगीक कलेच्या जोरावर इतके मोठे कर्तृत्व करून जातो. त्या कलाकाराला अभिजीत हरळीकर यांच्यासारखे एक व्यक्तिमत्व मैत्रीचा हात देऊन आपल्या मनातील स्वप्न पूर्ण करतात आणि मनातून रुपेश पवार यांची हरघडीला तारीफ करतात. हे पाहिल्यावर रुपेश पवार या कलाकाराबद्दल कुतूहल जागे होते. अशा सर्व कलात्मक कार्यामुळे रुपेश पवार यांनी अनेक लोकांना जोडलेले आहे, त्यांच्यावर विनम्रपणे प्रेम केले आहे, प्रत्येकाला रुपेश पवार प्रोत्साहन देतात हीच मोठी गंमत आहे. ही गंमत जंमत अशीच पुढे कायम रहावी याच सदिच्छा रुपेश पवारांना.

 

श्रुती रसाळ

+91 98332 08453

प्रतिक्रिया व्यक्त करा