इचलकरंजी : प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल व श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन यांच्या वतीने येथील श्री गजानन प्रिटींग प्रेसचे लक्ष्मण नायकवडे यांना व्होकेशनल ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आले. घोरपडे नाट्यगृहात झालेल्या एका शानदार समारंभात नूतन महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, रोटरीचे प्रांतपाल अरुण भंडारे, सहायक प्रांतपाल गिरीश कुलकर्णी, रोटरी व्होकेशनल डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी यतिराज भंडारी यांच्या हस्ते तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या ॲवॉर्डचे वितरण करण्यात आले.
येथील लक्ष्मण दादू नायकवडे यांनी १९७७ साली श्री गजानन प्रिटींग प्रेस उद्योग सुरु करुन त्यामध्ये काळानुरुप नवनवीन बदल स्विकारुन दर्जेदार व गुणवत्तापूर्ण छपाई कामाची सेवा अविरतपणे ठेवली आहे.तोच उद्योग आता त्यांचे चिरंजीव स्वप्नील नायकवडे हे अगदी यशस्वीरित्या समर्थपणे चालवत आहेत.त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेवूनच रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलने त्यांना यावर्षीचा व्होकेशनल ॲवॉर्ड जाहीर केला होता.नुकताच त्यांना विविध मान्यवरांच्या उपस्थितीत व्होकेशनल ॲवॉर्ड प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. हा ॲवाॅर्ड लक्ष्मण नायकवडे , त्यांच्या पत्नी सौ.शोभा नायकवडे आणि मुलगा स्वप्नील नायकवडे यांनी एकञितरित्या स्विकारला.यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या करणा-या व्यक्तींना देखील व्होकेशनल ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आले.यावेळी रोटरी क्लब सेंट्रलचे प्रेसिडेंट घनश्याम सावलानी , सेक्रेटरी प्रा.डाॅ.अमर कांबळे , प्रोजेक्ट कमिटी चेअरमन प्रमोद महाजन ,श्री दगडूलाल मर्दा फौंडेशनचे विश्वस्त श्यामसुंदर मर्दा यांच्यासह ॲवॉर्ड प्राप्त व्यक्ती ,प्रमुख मान्यवर , विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या उपस्थित होते.या ॲवॉर्डबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
