You are currently viewing दिगशी गावात शिवजन्मोत्सव सोहळा खूप मोठ्या उत्साहात साजरा

दिगशी गावात शिवजन्मोत्सव सोहळा खूप मोठ्या उत्साहात साजरा

*▪️दिगशी गावात शिवजन्मोत्सव सोहळा खूप मोठ्या उत्साहात साजरा*

*▪️शिवप्रेरित युवा संघटनेचे आयोजन*

वैभववाडी

*शिवप्रेरित युवा संघटना दिगशी आयोजित भव्य शिवजयंती उत्सव सोहळा खूप मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला . यावेळी ग्रामस्थ खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते खास करून महिलांची उपस्थिती लक्षणीय होती इतर गावातील शिवप्रेमी देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.*

*दिगशी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून या सोहळ्याला सुरुवात करण्यात आली.यावेळी संपूर्ण परिसर ” छत्रपती शिवाजी महाराज की जय।”, “जय भवानी जय शिवाजी” , “तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय” अश्या घोषणांनी दणाणून गेला.*
*यावेळी शिवप्रेरित युवा संघटनेच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या “माझं गाव दिगशी ” या स्वागत स्तंभाचं आणावरण श्री. नासिर काझी यांच्या हस्ते करण्यात आले .तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल ,श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.*
*यावेळी बोलताना नासिर काझी यांनी संघटनेच्या कार्याच कौतुक करत इतर गावांनी या संघटनेचा आदर्श घ्यावा असं आव्हाहन देखील केले.*
*दुपारी उपस्थित सर्व शिवभक्तांनी स्नेहभोजनाचा लाभ घेतला .*
*सायंकाळी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला त्यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.*
*यानंतर महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.*
*यावर्षीची पैठणीच्या मानकरी ठरल्या सौ. आरती गजानन मोरे.*
*या सोबतच उपस्थित सर्वांसाठी अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या व विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.*
*प्रेक्षकांना देखील लकी ड्रॉ च्या माध्यमातून बक्षिसे जिंकता आली.*

*या कार्यक्रमानिमित्त घेण्यात आलेला सर्व स्पर्धांची बक्षीसे दरवर्षी प्रमाणे श्री. सुरेश मांडवकर यांच्या कडून देण्यात आली.*

*रात्री 8 वाजता बुवा श्री.मोतीराम सोलकर यांच्या सुस्वर भजनाने शिवजन्मोत्सव सोहळ्याची अजूनच शोभा वाढवली.*
*त्यांनतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली, रात्री 12 पर्यंत रंगलेला या सांस्कृतिक कार्यक्रमांनतर बक्षीस वितरण करून या सोहळ्याची सांगता झाली.*

*या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा उपाध्यक्ष श्री. नासिर काझी, जिल्हा परिषद सदस्य -श्री.प्रमोद रावराणे,पंचायत समिती सदस्या – सौ. सुवर्णा संसारे,श्री.देवानंद पालांडे, शारदा कांबळे,सरपंच -प्रियांका हरयाण ,संतोष हरयाण,उपसरपंच -चंद्रकांत पाष्टे, महेश संसारे ,ग्रामपंचायत सदस्या सायली धुरी,चित्रा हरयाण,ओमकार हरयाण ,सुरेश हरयाण, जयराज हरयाण ,सुप्रिया मंचेकर अशा अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.*

*यावेळी उपस्थित सर्वांचे व हा सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे शिवप्रेरित युवा संघटनेचे अध्यक्ष श्री .स्वप्निल (पप्पू) धुरी यांनी आभार मानले.*

प्रतिक्रिया व्यक्त करा