You are currently viewing वैभववाडीत रसायनशास्त्राचा जागतिक संगम

वैभववाडीत रसायनशास्त्राचा जागतिक संगम

*वैभववाडीत रसायनशास्त्राचा जागतिक संगम : ‘फ्रंटियर्स इन केमिकल सायन्सेस–२०२६’ आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न*

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्ती अंगीकृत करावी- सन्मा. सदानंद रावराणे

वैभववाडी

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील
रसायनशास्त्र विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद “फ्रंटियर्स इन केमिकल सायन्सेस–२०२६” ही परिषद दिनांक १७ व १८ फेब्रुवारी २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण आणि शैक्षणिक वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. रसायनशास्त्र क्षेत्रातील आधुनिक संशोधन, शाश्वत तंत्रज्ञान, हरित रसायनशास्त्र आणि नवोन्मेषी संशोधन यांचा जागतिक स्तरावर विचारमंथन घडवून आणणारा हा महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रम ठरला. परिषदेमध्ये देश-विदेशातील नामवंत शास्त्रज्ञ, प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी व संशोधनप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या परिषदेमध्ये २५० पेक्षा जास्त संशोधकांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला. दोन दिवस चाललेल्या या परिषदेमध्ये विविध तांत्रिक सत्रे, व्याख्याने, संशोधन सादरीकरणे व चर्चासत्रांमुळे ज्ञानाचा व्यापक आदान-प्रदान झाला.
परिषदेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री.सदानंद रावराणे (कार्याध्यक्ष, महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था, मुंबई) हे उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी सन्मा. सदानंद रावराणे यांनी विज्ञान व संशोधन क्षेत्रातील नवकल्पनांचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी संशोधनाभिमुख दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन केले. तसेच विज्ञान व संशोधन क्षेत्रात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी पुढे येणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. परिषदेचे संयोजक डॉ. डी. एम. सिरसट यांनी प्रास्तविक करून परिषदेचे उद्धिष्ट स्पष्ट केले. यावेळी उदघाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुणे सन्मा. डॉ. प्रकाश वडगावकर (जेष्ठ शास्त्रज्ञ पॉलिमर अँड इंजिनिअरिंग विभाग, CSIR–NCL, पुणे), डॉ. अदेबायो ओलोशो (अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ निगेरिया, योला, निगेरिया), श्री.शरदचंद्र रावराणे (विश्वस्थ, महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था, मुंबई) श्री. सज्जनकाका रावराणे (अध्यक्ष, स्थानिक समिती, महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था, मुंबई), श्री.प्रमोद रावराणे (सचिव, स्थानिक समिती, महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था, मुंबई), श्री.सतीश रावराणे (विश्वस्थ, महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था, मुंबई), डॉ. एस. आर. पुजारी (प्राध्यापक, दयानंद महाविद्यालय, सोलापूर बी अध्यक्ष, रसायनशास्त्र अभ्यासमंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर), डॉ. रामचंद्र व्हनभट्टे (संत गाडगे महाराज महाविद्यालय, कराड), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी, उपप्राचार्य डॉ. एम. आय. कुंभार, डॉ. डी. एम. सिरसट उपस्थित होते.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे व बीजभाषक म्हणून सन्मा. डॉ. प्रकाश वडगावकर (जेष्ठ शास्त्रज्ञ पॉलिमर अँड इंजिनिअरिंग विभाग, CSIR–NCL, पुणे) उपस्थित होते. त्यांनी “Bio-Based Monomer and Polymer – A Step to Sustainable Plastic Industry” या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. त्यांनी जैवाधारित पॉलिमर निर्मिती, पर्यावरणपूरक प्लास्टिक उद्योग आणि शाश्वत विकासासाठी रसायनशास्त्राची भूमिका यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी जैवआधारित पॉलिमरच्या माध्यमातून पर्यावरणपूरक प्लास्टिक उद्योगाची गरज अधोरेखित केली. त्यांच्या व्याख्यानाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या परिषदेमधील विशेष अभिमानाची बाब म्हणजे पाच परदेशी संशोधक व मार्गदर्शक व्यक्तींनी दोन दिवस सक्रिय सहभाग नोंदविला व आपले संशोधन कार्य परिषदेमध्ये सादर केले. यामध्ये अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ नायजेरियाचे डॉ. अडेबायो आयझॅक ओलोशो, सिरियाचे डॉ. हसन नबिह मन्ना, अफगाणिस्तानचे डॉ. अमानुल्लाह अदील, दक्षिण अमेरिकेतील चिलीचे श्री. थियोडोरो फुएंटेस व दक्षिण आफ्रिकेचे श्री. तिफापी फिरी यांचा समावेश होता. त्यांच्या सहभागामुळे परिषदेला जागतिक स्वरूप प्राप्त झाले.
परिषदेच्या उद्घाटन सत्रात रसायनशास्त्र क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या चार वरिष्ठ प्राध्यापकांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सन्मानित मान्यवरांमध्ये डॉ. सुनील पाटील (संचालक, विद्यार्थी विकास विभाग, मुंबई विद्यापीठ), डॉ. घनश्याम साठे (रसायनशास्त्र विभागप्रमुख, दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेज, दापोली), डॉ. हरिश्चंद्र परबत (रसायनशास्त्र विभागप्रमुख, विल्सन कॉलेज, मुंबई), डॉ. अपर्णा कुलकर्णी (रसायनशास्त्र विभागप्रमुख, गोगटे-जोगळेकर कॉलेज, रत्नागिरी) यांचा समावेश होता. रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. सतीश करपे यांनी मुंबई विद्यापीठातून विद्यावाचस्पती पदवी मिळविल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. या वरिष्ठ चार प्राध्यापकांच्या विशेष सन्मानामुळे या परिषदेला विशेष शैक्षणिक प्रतिष्ठा प्राप्त झाली. याचबरोबर या उदघाटन सत्रामध्ये दोन महत्त्वपूर्ण शैक्षणिक पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यामध्ये “Success Guide to Organic Chemistry” (लेखक – डॉ. एच. व्ही. चव्हाण, डॉ. पी. एस. भाले, डॉ. एस. एम. देशमुख, डॉ. डी. एम. सिरसट व डॉ. डी. एस. माने) व “Soil and Water Analysis Technique” (लेखक – डॉ. जी. बी. साठे, डॉ. दिनेश भगत, डॉ. हेमंत अकोलकर व डॉ. डी. एम. सिरसट).
दोन दिवस परिषदेच्या विविध सत्रांमध्ये नामवंत शास्त्रज्ञांनी विविध आधुनिक विषयांवर मार्गदर्शन केले. यामध्ये डॉ. अदेबायो ओलोशो (अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ निगेरिया, योला, निगेरिया), विषय – Waste to Best Conversion and Sustainable Chemistry, डॉ. विठ्ठल सप्ताळ (रामानुजन फेलो, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), विषय – Homogenous vs Heterogenous Catalysis, डॉ. गजानन राशिनकर (प्राध्यापक, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) विषय – Ionic Liquid in Organic Syntheis, डॉ. एस. आर. पुजारी (प्राध्यापक, दयानंद महाविद्यालय सोलापूर) विषय – Green Material Synthesis for Energy Application, डॉ. गिरीश गुंड (सहाय्यक प्राध्यापक, वीर वाजेकर महाविद्यालय, फुंडे, पनवेल) विषय – Advanced Material for Ionic Battery, डॉ. अर्चना कालेकर (सहाय्यक प्राध्यापक, ऐकत, मुंबई) विषय – Advanced Material Strategies for Electrochemical and Photo-Electrochemical Hydrogen Production. या सत्रांमधून ऊर्जा, पर्यावरण, कॅटॅलिसिस, हरित रसायनशास्त्र आणि आधुनिक पदार्थ विज्ञानातील संशोधनाच्या नव्या संधी स्पष्ट झाल्या.
परिषदेदरम्यान देश-विदेशातील एकूण ८० संशोधकांनी आपले संशोधन Oral Presentation व Poster Presentation च्या माध्यमातून सादर केले. विद्यार्थ्यांनी व संशोधकांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण संशोधनाला परीक्षकांनी विशेष दाद दिली व उत्कृष्ट संशोधन सादरीकरणासाठी Best Oral Presenter Award व Best Poster Presenter Award देऊन सहभागींचा गौरव करण्यात आला. यामुळे युवा संशोधकांना संशोधनासाठी प्रेरणा मिळाली.
परिषदेदरम्यान देश-विदेशातील एकूण ८० संशोधकांनी आपले संशोधन Oral Presentation व Poster Presentation च्या माध्यमातून सादर केले. विद्यार्थ्यांनी व संशोधकांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण संशोधनाला परीक्षकांनी विशेष दाद दिली व उत्कृष्ट संशोधन सादरीकरणासाठी Best Oral Presenter Award व Best Poster Presenter Award देऊन सहभागींचा गौरव करण्यात आला. यामध्ये अफगाणिस्तानचे डॉ. अमानुल्लाह अदील, दक्षिण अमेरिकेतील चिलीचे श्री. थियोडोरो फुएंटेस, दक्षिण आफ्रिकेचे श्री. तिफापी फिरी, डॉ. माधुरी भगत, डॉ. वैष्णवी कुटे, कु. अमरसिंह मायनाक, श्री. पांडुरंग बंडे, कु. रोहिणी कदम, कु. राखी सावंत, कु. मृणाल फाटक, कु. दीपराज रावराणे. यामुळे युवा संशोधकांना संशोधनासाठी प्रेरणा मिळाली.
दोन दिवसाच्या या आंतराष्ट्रीय परिषदेचा समारोप अतिशय उत्साहाने व आनंदाने करण्यात आला. समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एस. एस. चव्हाण (प्राध्यापक व विभागप्रमुख, रसायनशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “आजच्या जागतिक परिस्थितीत शाश्वत व परिणामकारक संशोधन ही केवळ आवश्यकता नसून मानवजातीच्या भविष्यासाठी अनिवार्य जबाबदारी आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांना आंतरशाखीय संशोधन, हरित तंत्रज्ञान आणि सामाजिकदृष्ट्या उपयुक्त विज्ञानाकडे वळण्याचे आवाहन केले. समारोप समारंभाचे अध्यक्ष म्हणून डॉ. एस. आर. पुजारी (प्राध्यापक, दयानंद महाविद्यालय, सोलापूर बी अध्यक्ष, रसायनशास्त्र अभ्यासमंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर) यांनी भूषविले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित डॉ. गजानन राशीनकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी, उपप्राचार्य डॉ. एम. आय. कुंभार, डॉ. सी. डी. भेंकी, डॉ. हेमंत अकोलकर, डॉ. डी. एम. सिरसट उपस्थित होते.
परिषदेचे संयोजक व रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. डी. एम. सिरसाट यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन करताना सांगितले की, या परिषदेचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधनाशी जोडणे हा होता आणि तो यशस्वीरित्या साध्य झाला आहे. दोन दिवस चाललेल्या या परिषदेमुळे संशोधन सहकार्य, ज्ञानविनिमय आणि वैज्ञानिक दृष्टीकोन वृद्धिंगत झाला. “फ्रंटियर्स इन केमिकल सायन्सेस–२०२६” ही परिषद केवळ शैक्षणिक कार्यक्रम न ठरता संशोधन, नवकल्पना आणि जागतिक सहकार्याचा प्रभावी मंच ठरली. शाश्वत विकास, हरित रसायनशास्त्र आणि आधुनिक पदार्थ विज्ञान या विषयांवर झालेल्या सखोल चर्चेमुळे सहभागी संशोधकांना नवीन संशोधन दिशा मिळाल्या. विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापक यांच्यात निर्माण झालेला संवाद, आंतरराष्ट्रीय सहकार्याची संधी आणि ज्ञानाचा व्यापक विस्तार यामुळे ही परिषद वैभववाडीच्या शैक्षणिक इतिहासातील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरली.
परिषद यशस्वी होण्यासाठी परिषदेचे संयोजक व रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. डी. एम. सिरसट, सचिव डॉ. केशव पाखरे, सहसंयोजक डॉ. एस. एम. करपे, सहसचिव डॉ. व्ही. बी. गोपूला, पीएम-उषा समन्वयक डॉ. किरण पाटील, डॉ. दर्शना कोरगावकर, प्रा. विजय शिंदे, प्रा. रमेश काशेट्टी, प्रा. सचिन पाटील, प्रा. प्रदीप ढेरे, प्रा. रणजित पाटील, डॉ. संतोष राडे, मिस. कलावती सुतार यांनी विशेष परिश्रम घेतले. या परिषदेचे सूत्रसंचालन डॉ. दर्शना कोरगावकर यांनी केले. परिषदेचे संयोजक व रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. डी. एम. सिरसट यांनी परिषद यशस्वी करण्यासाठी सर्व मान्यवर, संशोधक, विद्यार्थी, आयोजक समिती सदस्य व स्वयंसेवकांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा