You are currently viewing शिवजयंती निमित्त फोंडाघाट भगवामय

शिवजयंती निमित्त फोंडाघाट भगवामय

शिवजयंती निमित्त फोंडाघाट भगवामय;

कुळाचीवाडी व एसटी स्टॅन्ड येथे उत्साहात कार्यक्रम

फोंडाघाट (प्रतिनिधी):

फोंडाघाट परिसरात शिवजयंती उत्साहात आणि भगवामय वातावरणात साजरी करण्यात आली. कुळाचीवाडी येथे शिवपुतळ्याजवळ सकाळी सत्यनारायण महापूजेनंतर पुतळ्याला अभिषेक करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आकर्षक व नेत्रदीपक रोषणाईमुळे परिसर उजळून निघाला होता.
कार्यक्रमस्थळी उपस्थित सर्व पदाधिकारी आणि मान्यवरांनी येणाऱ्या सर्वांचे भगवी शाल देऊन स्वागत केले. त्यानंतर एसटी स्टॅन्ड येथेही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी मंडळाचे स्वर्गीय सचिन नाकाडे यांचीही कृतज्ञतापूर्वक आठवण करण्यात आली.
मंडळातर्फे साकारण्यात आलेले शिवाजी महाराज, मावळे, जिजाऊ माता आणि बाल शिवाजी महाराज यांचे सजीव देखावे विशेष आकर्षण ठरले व उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
दोन्ही ठिकाणी भेट देत अजित नाडकर्णी यांनी मंडळाचे अभिनंदन केले तसेच यथाशक्ती आर्थिक मदतही प्रदान केली. एकूणच, फोंडाघाटमधील शिवजयंती उत्साह, भक्तीभाव आणि एकोप्याच्या वातावरणात संपन्न झाली.
शिवाजी महाराज की जय! 🚩

प्रतिक्रिया व्यक्त करा