_*भोसले फार्मसी कॉलेजमध्ये २१ फेब्रुवारीला राष्ट्रीय परिषदेचे आयोजन….*_
_*सलग आठवे वर्ष, तीनशेहून अधिक विद्यार्थी-संशोधकांचा सहभाग….*_
सावंतवाडी
_यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने सलग आठव्या वर्षी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. २१ फेब्रुवारी रोजी संपन्न होणाऱ्या या परिषदेचा मुख्य विषय हा ‘औषध संशोधन व विकास प्रक्रियेत प्रगत तंत्रज्ञानाची भूमिका’ असा आहे. या परिषदेत पारंपरिक औषधी ज्ञानाला आधुनिक विज्ञानाची जोड देत जागतिक दर्जाची औषधनिर्मिती करण्याबाबत चर्चा केली जाणार आहे. औषध निर्मितीतील नव्या घडामोडी, प्रगत तंत्रज्ञान आणि औद्योगिक गरजांशी सुसंगत शैक्षणिक दृष्टीकोन यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. यावेळी शिक्षण व उद्योग क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ उपस्थित राहतील._
_प्रमुख अतिथी म्हणून गव्हर्नमेंट फार्मसी कॉलेज, रत्नागिरीचे प्राचार्य डॉ.सुनीलकुमार बोथरा उपस्थित राहतील. विषयतज्ज्ञ म्हणून गोवा कॉलेज ऑफ फार्मसीचे डॉ.तितीक्ष देवळे आणि ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सचे अमोघ दांडेकर उपस्थित राहतील. सकाळच्या सत्रात मान्यवरांचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांशी संवाद तर दुपारच्या सत्रात भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धा संपन्न होईल. यामध्ये विविध राज्यांतील विद्यार्थी संशोधनात्मक संकल्पना मांडतील. यासाठी कर्नाटक, गोवा, गुजरात व महाराष्ट्र आदी ठिकाणांहून तीनशे पेक्षा जास्त विद्यार्थी, शिक्षक व संशोधक सहभागी होणार आहेत._
_परिषद यशस्वी होण्यासाठी कॉलेजचे प्राचार्य डॉ.विजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन समिती सचिव प्रा.गौरी भिवशेट, समन्वयक डॉ.तुषार रुकारी, डॉ.रोहन बारसे, डॉ.विनोद मुळे, प्रा.सत्यजित साठे व प्रा.स्नेहा सावंत हे मेहनत घेत आहेत._
