🏰 *साळगाव महाविद्यालयात शिवकालीन ऐतिहासिक वस्तूंच्या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद..!*
📍 कुडाळ |
🚩 छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मरणार्थ साळगाव येथील परम पूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विद्यालयाच्या सभागृहात शिवकालीन ऐतिहासिक वस्तूंचे भव्य प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले.
सावली फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित या प्रदर्शनात दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांनी संकलित केलेल्या शिवकालीन दुर्मिळ वस्तू विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आल्या. शिवभक्त ज्ञानेश्वर गोविंद राणे आणि श्री. राजाराम उर्फ आबा चिपकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वस्तू हाताळत इतिहासाची माहिती जाणून घेण्याची अनोखी संधी मिळाली.
🎓 लक्ष्मीनारायण विद्यालय बिबवणे, साळगाव जि.प. शाळा नं. ३, जांभरमळा जि.प. शाळा नं. ५, शिवराज मराठा माध्यमिक विद्यालय साळगाव यांसह परिसरातील एकूण ८ शाळांतील २४० विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. ग्रामस्थांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
✨ उद्घाटन प्रसंगी मा. श्री. मुकुंद धुरी (माजी मुख्याध्यापक व अध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशी), मा. श्री. प्रदीप प्रभूतेंडोंलकर (संस्था सचिव), सावली फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. सावली पाटकर, प्राचार्य प्रा. सचिन पाटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन एस एस विभाग प्रमुख प्रा. भक्ती चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. रामदास पास्ते यांनी मानले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रदर्शन यशस्वी केले.
📖 इतिहास जिवंत ठेवण्याचा आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा सुंदर उपक्रम सर्वांच्या मनात अभिमानाची भावना जागवून गेला.
#शिवजयंती #शिवकालीनइतिहास #साळगाव #कुडाळ #सिंधुदुर्ग #शिवप्रेम 🚩
