*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.सौ. मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सेवा*
दु:खाचा डोंगर होता सामोरी त्याला गेले
ना रडले पडले पाया सिद्ध मी स्वतःला केले
सत्याशी मैत्री केली डगमगले मुळीच नाही
लोभाच्या आसक्तीने मी मार्ग बदलला नाही
माणुसकी जपता जपता देवाची सेवा घडली
संस्कार शिदोरी घरची ना कधी विसरता आली
ज्येष्ठांचा आदर केला ऋण सामाजिकही स्मरले
मदतीला धावत जाता मी रक्तदानही केले
ना कधीच केला देवा अर्पण मी नारळ तुजला
भगवंत वेगळा नाही रुग्णांत मला तो दिसला
©️®️ डॉ मानसी पाटील
