नगराध्यक्ष प्रियंका साळसकर यांची माहिती
देवगड
शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०१७/प्र.क्र.१८३/नवि.२०, दिनांक ०४/०६/२०१८ अन्वये पथदिवे फक्त LED पथदिवे Energy Efficiency Services Limited (EESL) या कंपनीमार्फत बसविणे बंधनकारक आहेत. देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यालयामार्फत १२०० LED लाईटची मागणी केली असता सदर EESL कंपनी मार्फत 35w- 300 लाईट पुरविण्यात आल्या त्या नंतर माहे डिसें. २०१९ ला सुमारे १५०० LED लाईटची वारंवार लेखी,तोंडी व दुरध्वनी वरून मागणी केली असता माहे मार्च २०२० ला 35w- 300 लाईट पुरविण्यात आल्या त्या नंतर ऑक्टोंबर २०२० ला नवीन १८०० पथदिव्यांची मागणी केली आहे. परंतु EESL कंपनी मार्फत कोण्त्याही प्रकारे सहकार्य व लाईट पुरवठा होत नाही. अशी माहिती देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष प्रियांका साळकर यांनी दिली आहे.
याबाबत कंपनीच्या संबधित कर्मचारी व अधिकारी वर्गाशी संपर्क केला असता समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. याबाबत प्रादेशिक प्रमुख, ई. ई. एस. एल, नवी मुंबई व मा.आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय वरळी मुंबई यांच्याकडे दिनांक 29 1 2019 रोजी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.