You are currently viewing तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा आदर्श शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*तंत्रज्ञान*

 

अरे मिक्सर मिक्सर

करु नको बेजार

किती वेळा बिघडशी

वीज जाते वारंवार

 

दुरुस्ती करुनी किती वेळा

पाटा वरवंटा ओट्याखाली

खलबत्त्यात कुटुनि कधी

आले लसणाचा ठेचा घाली

 

अरे मिक्सर तू तर सिकंदर

आळशी होती सार्या बाया

खाली बसता मोडे कंबर

तुझ्याविना चालेना काया

 

घरघंटीही आली घरा

दळणवळण इथेच कांडा

मिरवितो पैशाचा तोरा

डॉक्टरकडे फेर्यां मारा

 

विजेची ही उपकरणे

क्षणात देती सर्वसाधने

व्यायामाचे नको देणे घेणे

आरामाची सारी संसार साधने

 

पैसा येतो घरी भसाभसा

माॅर्निंगवाॅक ,जिम ,कीटीपार्टी

करावा त्याचा कसा उपसा

मम्मी, डॅडी, बाहेर उनाडती कार्टी

 

आरोग्यासाठी मेडिटेशन

पैसे भरा, गाडीने जाऊन

वेदिक्युअर, पंचकर्म करा

व्यायामाशिवाय पैसै घालवून.

 

 

स्वप्नगंधा सतीश आंबेतकर

कला शिक्षिका

प्रतिक्रिया व्यक्त करा