You are currently viewing राष्ट्रीय गुप्तचर ब्युरो नावाचा गैरवापर फसवणूक प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर

राष्ट्रीय गुप्तचर ब्युरो नावाचा गैरवापर फसवणूक प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर

राष्ट्रीय गुप्तचर ब्युरो नावाचा गैरवापर फसवणूक प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर

ऍड. अशपाक शेख यांचा यशस्वी युक्तिवाद

सिंधुदुर्गनगरी

National Intelligence Bureau चा वरिष्ठ अधिकारी असल्याची खोटी ओळख देऊन आरोपीने फिर्यादीच्या वडील व काका यांचे व्यवहारिक ज्ञान नसल्याचा गैरफायदा घेत जमिनीच्या कामकाजाच्या नावाखाली वेळोवेळी ५,५३,००० रुपये उकळल्याचा आरोप आहे. तसेच जमिनीचा ३० टक्के हिस्सा देण्याबाबत करार करून फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. ११/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), २०४ व २०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीस दिनांक १२/०२/२०२६ रोजी अटक करण्यात आली होती. जामीन अर्जावरील सुनावणीनंतर ओरोस येथील मा. अति मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी दिनांक १४/०२/२०२६ रोजी आरोपीस रुपये ५०,०००/- च्या जामिनावर व अटी-शर्तींसह मुक्तता करण्याचा आदेश दिला. आरोपीच्या वतीने अॅड. अशपाक शेख यांनी काम पाहिले असून अॅड. पंकज खरवडे, अॅड. विनय रजपूत, अॅड. कैस शेख व ॲड. भूषण कदम यांनी सहाय्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा