महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील (जलसंपदामंत्री महाराष्ट्र)यांच्या आदेशान्वये तसेच सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या सुचनेनुसार सिंधुदुर्ग सामाजिक न्याय विभागाची बैठक सावंतवाडी येथे पुंडलीक दळवी यांच्या संपर्क कार्यालयात जिल्हाध्यक्ष (सामाजिक न्याय विभाग )दिपक जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी दिपक जाधव यांनी कार्यकर्त्याना मार्गदर्शन केले. सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी ही ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद व विधानसभा या आधारावर असेल व प्रत्येक पदाधिकारी यांनी याचा अभ्यास करुन दर महीन्याला आढावा बैठक घेउन सादर करायच्या सुचना दिल्या. लवकरच सामाजिक न्याय विभागाची जंबो कार्यकारणी जाहिर करण्यात येइल असे सांगितले.
यावेळी सामाजिक न्याय विभाग जिल्हा सरचिटणीस म्हणुन मालवण चे योगेश मधुकर वराडकर यांची नियुक्ती करुन तशाप्रकारचे त्यांना आज नियुक्तिपत्र देण्यात आले. याच बरोबर वेंगुर्ला तालुकाध्यक्ष म्हणुन मोहन सखाराम जाधव व मालवण तालुकाध्यक्ष म्हणुन राजेंद्र आत्माराम वराडकर यांना ही नियुक्तिपत्र देण्यात आले.
यावेळी
पुंडलीक दळवी सावंतवाडी तालुकाध्यक्ष व व्यापारउद्योग सेल जिल्हाध्यक्ष
चित्रा बाबर देसाई व्यापारउद्योग महिला जिल्हाध्यक्ष
जावेद शेख अल्पसंख्यक सेल सावंतवाडी तालुकाध्यक्ष
देवा टेमकर सावंतवाडी शहर अध्यक्ष
प्रसाद दळवी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पदवीधर सेल
सचिन पाटकर सोशल मिडीया जिल्हा प्रमुख
राजगुरू मॅडम
हिदायतुल्ला खान व्यापारउद्योग जिल्हा कार्याध्यक्ष
अरुण जाधव सावंतवाडी तालुकाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग
संदिप पिंगुळकर कुडाळ तालुकाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग
सुप्रिया पिंगुळकर महीला जिल्हा संघटक सामाजिक न्याय विभाग उपस्थित होत्या.