*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*फुलं*
( आजच्या व्हॅलेंटाईन डे निमित्त )
—————————————————————-
गुलाब, मोगरा,जाई,जुई
गुच्छ कोणताही द्यावा
फक्त देण्यापूर्वी एकदा
गंध श्वासात भरून घ्यावा
काही फुलं सुंदर, नाजूक
काही फुलं दर्वळतात
मिटून गेली तरी काही
मनामध्ये हिंदकळतात
काही फुलं अबोल असतात
बोलत नाहीत काही सुद्धा
वहिच्या पानात लपून
सोडत नाहीत आपला मुद्दा
गंधाळलेली काही फुलं
फार फार हिंस्त्र असतात
आकर्षक साज लेऊन
काट्या मध्ये लपून बसतात
आजच्या दिनी फुले देताना
रेशीम स्पर्श अंगी ल्यावा
फुलांचा तो गंध अनोखा
जन्मभर सोबत घ्यावा
श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
@ सर्व हक्क सुरक्षित
केवळ नावासहितच पुढे पाठवावे
9130861304
चौदा फेब्रुवारी दोन हजार सहव्विस
