You are currently viewing श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयात मोडीलिपी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयात मोडीलिपी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

चिखली / (बबनराव आराख) :

श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय, चिखली (जि. बुलडाणा) येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने PM USha Soft Component 3.0 अंतर्गत आयोजित सर्टिफिकेट कोर्स स्वरूपातील मोडीलिपी प्रशिक्षण कार्यशाळा दि. १५ नोव्हेंबर २०२५ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत यशस्वीरीत्या पार पडली.सदर कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. प्रमोद आर. पडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली व IQAC समन्वयक प्रा. डॉ. व्ही. यु. पोच्छी यांच्या समन्वयाने राबविण्यात आली. कार्यशाळेत मोडीलिपी विषयातील तज्ज्ञ अभ्यासक मा. प्रा. डॉ. नामदेव ढाले, मा. प्रा. मधुकर जाधव व मा. प्रा. डॉ. श्रीकांत तळेकर यांनी मोडीलिपीचा इतिहास, विकास, वाचन-लेखन तंत्र तसेच ऐतिहासिक कागदपत्रांवरील प्रत्यक्ष सराव यांचे विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

दरम्यान,कार्यशाळेत विद्यार्थ्यांना सनदा, दप्तर नोंदी व प्राचीन हस्तलिखितांचे वाचन करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी कार्यशाळेच्या कालावधीत दररोज नियमित सत्रांसह सुटी व सुटीचे तास वगळून दुपारी ४.०० ते ५.०० या वेळेत विशेष सराव सत्रांचे आयोजन करण्यात आले.

सदर प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या मोडीलिपी वाचन व लेखन कौशल्यात लक्षणीय प्रगती होईल, असे मान्यवरांनी सांगितले.

कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी मराठी विभागप्रमुख डॉ. गणेश मालटे, PM USHA समन्वयक डॉ. एस. आय. जुक्कलकर, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुनिता कलाखे तसेच समन्वय समितीतील डॉ. संदीप उन्हाळे, प्रा. प्रशांतकुमार डोंगरदिवे, प्रा. अविनाश पडघान, प्रा. अक्षय वाकोडे व प्रा. किसन वाघ यांनी विशेष परिश्रम घेतले.

मोडीलिपी प्रशिक्षण कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये ऐतिहासिक दस्तऐवज वाचनाची आवड निर्माण झाली असून मराठी व इतिहास विषयाच्या अभ्यासासाठी सदर कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत उपस्थितांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा