वैभववाडी
जगभर हाहाकार माजविणा-या कोरोनाने अक्षरशः जनजीवन विस्कळीत केले आहे. या काळात गावातील संक्रमण रोखण्यासाठी जिवाची बाजी लावून काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना शिवप्रेमी मित्रमंडळ खांबाळे व भैरी भवानी प्रतिष्ठान आचिर्णे यांच्यावतीने खांबाळे गावचे युवा सामजिक कार्यकर्ते, संगणक परिचालक रुपेश कांबळे यांना ‘कोव्हिड योध्दा’ पुरस्काराने भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे, पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांचे हस्ते गौरविण्यात आले.
शिवप्रेमी मित्रमंडळ खांबाळे व सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान व रक्तगट तपासणी शिबिर कार्यक्रमावेळी एकूण १५ कोरोना योध्यांचा सत्कार करण्यात आला.
लोकांमध्ये जाऊन जनजागृती करणे, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यामध्ये या कर्मचाऱ्यांनी महत्वाचे योगदान दिले आहे.
सत्कार केलेल्या १५ कोरोना योध्यांमध्ये कैलास वानोळे (आरोग्य सेवक), एस. ए. बोडेकर (आरोग्य सेविका), रंजना भड (आरोग्य सेविका), जी. डी. कोकणी (ग्रामसेवक), माजी सरपंच सारिका सुतार, माजी उपसरपंच लहू साळुंखे, मंगेश कांबळे (तंटामुक्त समिती अध्यक्ष), धनश्री देसाई (अंगणवाडी सेविका), पूजा पवार (अंगणवाडी सेविका), पूजा गुरव (अंगणवाडी सेविका), एकनाथ उर्फ अंबाजी पवार (नळ कामगार), सदानंद पवार (ग्रामपंचायत शिपाई) यांचा समावेश आहे.
यावेळी व्यासपीठावर भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे, पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, जि.प. सदस्या पल्लवी झिमाळ पाचकूडे, सरपंच गौरी पवार, उपसरपंच गणेश पवार, माजी सरपंच विठोबा सुतार, शिवप्रेमी मित्र मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ गुरव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमोद लोके, ग्रामपंचायत सदस्य प्रविण गायकवाड, अमोल चव्हाण, राजेश पडवळ, माजी उपसरपंच लहू साळुंखे, माजी चेअरमन दीपक चव्हाण, ग्रामसेवक जी. डी. कोकणी, व्यापारी महासंघाचे संजय लोके आदी उपस्थित होते.