You are currently viewing हिंदू समाज बळकट करणे हे माझे परम कर्तव्य – मंत्री नितेश राणे

हिंदू समाज बळकट करणे हे माझे परम कर्तव्य – मंत्री नितेश राणे

हिंदू समाज बळकट करणे हे माझे परम कर्तव्य – मंत्री नितेश राणे

आंगणेवाडी येथे ‘रील्स’ स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात प्रतिपादन

मालवण

“मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आणि आमदार म्हणून कार्य करत असलो, तरी त्याही आधी मी एक कट्टर हिंदू म्हणून तुमच्यासोबत सदैव उभा आहे. हिंदू समाजाला बळकट करणे आणि त्याची सुरक्षा करणे हे माझे परम कर्तव्य आहे,” असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिक जत्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल, सिंधुदुर्ग यांच्या वतीने हिंदू धर्मावर होणारी विविध आक्रमणे, लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि धर्मांतरण यांसारख्या विषयांवर जनजागृती करण्यासाठी ‘रील्स’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात मंत्री राणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना राणे म्हणाले की, ही रील्स स्पर्धा केवळ स्पर्धा नसून हिंदू राष्ट्र अधिक भक्कम करण्याच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. समाजातील तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा