You are currently viewing मालवण पालिकेच्या विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड
Oplus_16908288

मालवण पालिकेच्या विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड

पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य-स्वच्छता व महिला बालकल्याण समित्यांची घोषणा

मालवण :

मालवण येथील नगरपालिकेच्या विषय समिती सभापती पदाची निवड प्रक्रिया आज पार पडली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हा कार्यक्रम पालिकेत घेण्यात आला. मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी निवडी जाहीर केल्या. निवडीनंतर पालिका परिसरात फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला.

सकाळच्या सत्रात शिंदे शिवसेना, भाजप आणि ठाकरे शिवसेना गटाकडून विविध समिती सदस्यांची नावे पीठासीन अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आली. दुपारी तीन वाजता सभापती पदांसाठी नामनिर्देशन पत्रे दाखल झाली.

यावेळी पालिकेची स्थायी समिती गठीत करण्यात आली असून अध्यक्षपदी ममता वराडकर, उपाध्यक्षपदी दीपक पाटकर, तर सदस्य म्हणून सहदेव बापर्डेकर, पूनम चव्हाण, अन्वेशा आचरेकर यांचा समावेश करण्यात आला आहे.

विषय समितीनिहाय निवड पुढीलप्रमाणे :

🔹 पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापती पदसिद्ध अध्यक्ष म्हणून उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांची निवड जाहीर. सदस्य : शर्वरी पाटकर, मेघा सावंत, ललित चव्हाण, तपस्वी मयेकर

🔹 सार्वजनिक बांधकाम समिती सभापती : सहदेव बापर्डेकर (बिनविरोध) यांची निवड सदस्य : मेघा सावंत, महेश कोयंडे, मंदार केणी, मंदार ओरसकर

🔹 सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता समिती सभापती : पूनम चव्हाण (बिनविरोध) यांची निवड सदस्य : सिद्धार्थ जाधव, नीना मुंबरकर, दर्शना कासवकर, अनिता गिरकर

🔹 महिला बालकल्याण समिती सभापती : अन्वेशा आचरेकर (बिनविरोध) यांची निवड उपसभापती : अश्विनी कांदळकर तर सदस्य : भाग्यश्री मयेकर, महानंदा खानोलकर, अनिता गिरकर

निवड प्रक्रियेदरम्यान महेश कांदळगावकर, सुरेश आचरेकर, पूनम चव्हाण यांनी आपले विचार मांडले. विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी नव्याने निवडून आलेल्या सभापतींचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

या निवडीनंतर पालिका प्रशासनात नव्या समित्यांच्या माध्यमातून विकासकामांना गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा