You are currently viewing माती…. पाणी…. दगड

माती…. पाणी…. दगड

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित ललीत लेख*

 

नैसर्गिक घटक..

माती…. पाणी…. दगड

 

अहाहा…विषय वाचताच मनात कारंजं नाचलं…सगळे विषय माझ्या आवडीचे.‌‌..कधी नि काय किती किती आठवणी मनात उचंबळून आल्यात.

मातीशी खेळू नका म्हणायचा आमचा बालपणीचा काळ नव्हता.यथेच्छ मातीत खेळलो,सगळ्यांसोबत.आमच्या खेडेगावी बैलगाडीने जातांना तर रस्ते बारीक धुळीने माखलेले,ती सगळी अंगावर उडे,केस भुरे होत

कपडे झटकले तरी धूळच धूळ…

पाऊस पडला की हीच माती मऊ मेणासारखी…शाळेतही मातीची खेळणी ,फळे बनवणे,व नंतर ती रंगवणे ,खूप आवडायचं.शेताततर पायाला हाय हिलपेक्षा ओल्या मातीचे पेंड चिकटत.ते दगडावर घासून काढायची मजाच…शेतात कोरड्या मातीत छोटासा भोवरा दिसला की काडीने उकरलं की त्यात काळा किडा निघायला.गंमतच….पावसाची चाहूल लागली की लालभडक मखमली किडे फिरतांना दिसत.

नंतर मातीची आवड घर अंगण सडा रांगोळीने पूर्ण झाली.मातीचा संपर्क कमी होत कुंडीपर्यंत सिमित झाला.पण रोप लावतांना हात ओल्या मातीला लागले की धन्य वाटतं.

मातीची विविध आकाराची भांडी ,खेळणी मनात आहेतच.

पाणी….झ-याचं झुळझुळतं,नदीचं खळखळ प्रवाहीत,तर सागराचं विशाल…अथांग..पावसाच्या थेंबाचा ओलेता स्पर्श रोमांच आणतात.त्याचं रौद्र सौम्य रूप ,प्रवासात बघितलेला पाऊस,झाडांना न्हाऊ घालणारा,डोंगर चकचकीत करणारा पाऊस लाडकाच वाटत आलाय.”पानी रे पानीतेरा रंग कैसा..‌.”

“गंगा यमुना डोळ्यात उभ्या का…”

ओहरे ताल मिले नदी के जल मे”

नदी मिले सागरमें”

पाण्याची सगळी रूपं आठवतांना मन गदगद होतं…

दगड तर बालपणीचा साथीदार…

ठेच लागून पडणं माझं नित्याचं,धांदरट ,नीट बघून चल..

मुक्ताफळं मिळत,मैत्रिणींसोबत

खेळलेले ऐरखडी,दुर्रखडी म्हणत

सात ,नऊ,अकरा खडे..नदीतले,वाळूतले,खेळायचे खडे..‌बिट्ट्या,सागरगोट्या,सगळं कसं नैसर्गिक..वेगवेगळ्या आकाराचे ,रंगाचे दगडमाझ्या आवडीचा विषय.‌‌..छान दिसला की निरखून बघायचा,,उचलून बघायचा,की कोणी बोलणारच..अगं दगडं कशाला बघतेस?काय सांगछ.मला आवडतातच हो…जिथे गेली तिथले वस्तू ,साड्या,सोबत दोन तीन दगड असतातच माझ्या बॅगेत… परदेशातही मी समुद्रातील छोटे चकाकते,रंगीत दगड व शंख शिंपले…वजनाची मर्यादा पाळत घरी आणले.केदारनाथच्या यात्रेत नद्यांमधे पिवळट छोटे‌ दगड ,त्यावर हिरव्या रेषा असणारे जणू पेंटिंगच केलेले..तेव्हाही ते मी सांभाळत आणलेच.दगडांच्या ओढीने बोलणेही खाल्ले,बॅगांचे वजन वाढले,पण दगड माझे जीव की‌ प्राण!आजही ते बघतांना ते ते

प्रसंग आठवतात.निसर्गाने किती भरभरून दिलंय मानवाला…

माती पाणी,दगड,झाडं,पानं फुलं

त्यातील सौंदर्य बघायला कलात्मक दृष्टीही मिळाली.हा आनंद असाच मनमुराद उपभोगावा…..!!

~~~~~~~~~~~~~~~

अरुणा दुद्दलवार✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा