You are currently viewing कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ले येथील जागृत देवस्थान श्री देव मानसीश्वराचा वार्षिक जत्रौत्सव गाव मर्यादीतचं होत आहे साजरा…..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ले येथील जागृत देवस्थान श्री देव मानसीश्वराचा वार्षिक जत्रौत्सव गाव मर्यादीतचं होत आहे साजरा…..

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

वेंगुर्ले

वेंगुर्ले येथील श्री देव मानसीश्वराचा वार्षिक जत्रौत्सव आज सकाळ पासून गाव मर्यादीत साजरा होत आहे. नवसाला पावणारा व भक्तांच्या हाकेला धावणारा अशी ख्याती असलेल्या श्री देव मानसीश्वराच्या जत्रौत्सवाला मानसीश्वराचे दर्शन व आशिर्वाद घेण्यासाठी तसेच नवस फेडण्यासाठी व बोलण्यासाठी भाविकांनी शासनाचे नियम पाळून दर्शनासाठी रांग लावली आहे.

वेंगुर्ले येथील श्री देव मानसीश्वोराचा वार्षिक जत्रौत्सव गाव मर्यादीत साजरा करण्यात येत असला तरी यंदा कोरोनाचे राज्यात सावट आहे. या पार्श्वभूमीवर वेंगुर्ले उभादांडा ग्रामस्थ हा जत्रौत्सव चांगल्या प्रकारे साजरा व्हावा, जास्ती गर्दी होऊ नये यासाठी ग्रामस्थ दाजी धुरी, दादा कुबल, भानू मांजरेकर, दादा केळुसकर, तुषार साळगावकर, सरपंच देवेंद्र डिचोलकर यांच्यासह सर्व ग्रामस्थ स्वतःहून मानसीश्वराच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांची काळजी घेत आहेत. तर येणा-या भाविकांना मास्क व सॅनिटाईजर वापरून दर्शनासाठी पाठवित आहे. तर कुठेही गर्दी होऊ नये याचीही दक्षता हे ग्रामस्थ घेत आहेत.

रात्रौ पार्सेकर दशावतारी नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा