You are currently viewing जलनिसरण व नियोजन सभापतीपदी आनंद नेवगी

जलनिसरण व नियोजन सभापतीपदी आनंद नेवगी

जलनिसरण व नियोजन सभापतीपदी आनंद नेवगी;

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा घेतला आशीर्वाद

सावंतवाडी :

सावंतवाडी नगर परिषदेमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सभापती निवडणुकीत नवनिर्वाचित नगरसेवक आनंद नेवगी यांची जलनिसरण व नियोजन सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सभापतीपदी निवड झाल्यानंतर आनंद नेवगी यांनी सायंकाळी गुरुकुल येथे जाऊन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा आशीर्वाद घेतला. यावेळी बबन साळगावकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी महामंडळ आयोग जिल्हा समन्वयक सिंधुदुर्ग नारायण सावंत, राजा शिवाजी मित्र मंडळाचे उपाध्यक्ष बंड्या तोरस्कर, दिलीप पवार, सामाजिक कार्यकर्ते अभय पंडित, अशोक पेडणेकर, मनोज घाटकर, इफ्तिकार राजगुरू, उमेश खटावकर, शिवम सावंत, मयूर लाखे, कादर गवंडी, धीरज गावडे तसेच सामाजिक बांधिलकी जपणारे रवी जाधव आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा