काही वेळा मनात असलेले प्रत्यक्षात यायला वेळ लागतो, वृक्षमित्र वनराई रक्षक यशस्वी खलनायक ,प्रत्यक्षात माणूसपण जपणारे, अशी ज्यांची ओळख आहे त्यांचे समन्वयक श्री अमोल जाधव ह्यांचेबद्दल कधीपासून लिहायचे होते, वेळ यावी लागते हेच खरे.
अमोल भाऊसाहेब जाधव यांचा जन्म अहमदनगर जवळील बुर्हाणनगरात एका शेतकरी कुटुंबात झाला, आई लक्ष्मीबाई, वडील भाऊसाहेब बहीण संगीता भाऊ सोमनाथ, व स्वतःअमोल असे हे पाच जणांचे कुटुंब ! आहे त्या परिस्थितीत कुरकुर न करता राहायचे,कष्ट करतांना लाज वाटू नये ही शिकवण लहानपणापासून मिळालेली , शेतकऱ्यांच्या नशिबी आर्थिक परिस्थिती पाचवीलाच पुजलेली असते. त्यामुळे कधीच कोणतेही काम करतांना त्यांना कमीपणा वाटलानाही.अमोल यांचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत गावातच झाले. अमोलला शिक्षणाची अतिशय आवड !ते नीट घेता यावे म्हणून अमोल फावल्या वेळेत मिळेल ते काम करीत. शिक्षण सुरु असतांनाच त्यांनी गावातील एका BAMS डॉक्टरकडे कंपाउंडरची नोकरी केली. त्यांच्या गावापासून नगर दहा पंधरा मिनिटांवर आहे. त्यामुळे नगरला जाऊन तेथेही ते सापडेल त्या मार्गाने अर्थार्जन करीत. चहा मिसळच्या हॉटेलातही त्यांनी काम केले आहे , अहमदनगर येथील न्यू आर्टस कॉलेज मधून राज्यशास्त्रात पदवी व अहमदनगर कॉलेज येथून पदव्युत्तर पत्रकारिता कोर्स पूर्ण झाल्यावर सन २००२ मध्ये इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाच्या निवासी
आश्रम शाळेत त्यांची वसतिगृह अधिक्षक म्हणून नियुक्ती झाली. ह्याच वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले, ते पितृसुखाला पारखे झाले , परंतु थांबून, रडत राहून चालणार नव्हते. खांद्यावर जवाबदारी होती , स्वतःचे दुःख मनात ठेवत ते पुन्हा कामाला लागले, गृहस्वामीनीच्या रुपात अश्विनी चे त्यांच्या जीवनात आगमन झाले जीवनाला थोडी स्थिरता आली . २०१० मध्ये त्यांची मा. अजितदादा पवार साहेबांशी ओळख झाली अमोलच्या कामाचा वेग व समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा या दोन्ही गोष्टींमुळे पवार साहेबांनी त्यांना २०१२ मध्येजिल्हा परिषद निवडणूकीत व २०१४ मध्ये नगर- राहुरी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली होती.
आश्रम शाळा मध्ये काम करताना आपण सुद्धा आदिवासी मुलांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काही उपक्रम सुरु करावा असे त्यांना वाटू लागले , सत्य संकल्पाचा दाता भगवान या उक्तीप्रमाणे त्यांनी २०१६ मध्ये अनमोल प्रतिष्ठान संस्था स्थापन करून त्या द्वारे अनमोल प्रतिष्ठान संचलित समर्थ आदिवासी प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रमशाळा सुरू केली. २०२३ मध्ये त्यांनी आणखी २ निवासी शाळा सुरू केल्या.
या आदिवासी निवासी शाळेत इयत्ता १ ली १० वी पर्यंत आदिवासी समाजातील साधारण ५०० ते ५५० विद्यार्थ्यांची प्रत्येक शाळेत राहण्याची सोय असलेल्या या वसतीगृहात मुले व मुलीची वेगळी चोख व्यवस्था आहे मुलांचे आरोग्य , जेवण अभ्यास याकडे बारकाईने लक्ष दिले जाते सर्व मूलभूत सोयी पुरविल्या जातात हे सर्व त्यांची पत्नी अश्विनी बारकाईने पाहते..सन २०१६ पासून अमोल यांनी मंत्रालयात विशेष कार्य अधिकारी म्हणून काम सुरू केले. मंत्रालयात काम करतांना अनेक मोठ्या नेत्यांशी ओळख झाली. माजी मंत्री विजय वडेट्टीवार, माजी राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री विजयकुमार गावित तसेच काही काळ त्यांनी श्री अंबादास दानवे (विरोधी पक्ष नेते विधान परिषद)यांच्या समवेत सुद्धा काम केले. सध्या ते मा.नरहरी झिरवाळ मंत्री अन्न व औषध प्रशासन यांच्या कार्यालयात विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. .मंत्रालयात काम करतांनाच त्यांची प्रसिद्ध अभिनेते श्री सयाजी शिंदे ह्यांच्याशी भेट झाली ते उत्तम कलाकार तर आहेतच पण मातीशी इमान राखणारे आहेत हे अमोलजींच्या लक्षात आले या जगात फक्त *आई आणि वृक्ष निस्वार्थ प्रेम करतात* हे सयाजीचे विचार त्यांच्या विचारांशी जुळले ,रुजले आणि दोघांची पक्की मैत्री झाली. २०१६ पासून सयाजीचे समन्वयक म्हणून ते सह्याद्री देवराईचे महाराष्ट्रात काम पाहत आहेत , दोघेही सतत एक दुसऱ्याच्या सावलीसारखे सोबत असतात. कोणतेही काम करतांना ही राम लक्ष्मणाची जोडी सतत बरोबर असते, मग ते बीडला लागलेल्या वनराईला विझविण्याचे काम असो की वृक्षारोपण असो. पत्नी अश्विनीच्या सहकार्यामुळे ते आपल्याकामात पूर्णपणे लक्ष देऊ शकतात ह्याची त्यांना जाणीव आहे ,संसारवेलीवर स्नेहा व ओम ही दोन गोड मुले आहेत. त्यांच्या कार्याची नीट माहिती काही वरिष्ठ अधिकारी, व राजकारणी लोकांना माहीत नसल्यामुळे गैरसमजातून त्यांच्याकडून त्रास झाला, तरी अमोलजी अतिशय प्रामाणिपणे आपले कार्य करीत आहेत. ते राष्ट्रवादी कांग्रेस चे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. आई व पत्नी ह्यांना अभिमान वाटेल अशी जनतेची सेवा करण्याची त्यांची तीव्र इच्छा आहे समाजातील सर्व घटकांना योग्य सुविधा मिळाल्या पाहिजे त्यांना आपले जीवन सन्मानपूर्वक जगता आले पाहिजे प्रत्येकाला मूलभूत
सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत असे वाटणाऱ्या अमोलजींना गावोगावी फिरून तेथील लोकांना भेटून तेथील संस्कृती व परंपरा पर्यावरण निसर्ग, लोककला इ विषयी माहिती करून घ्यायची आवड आहे. सध्या जरी ते सह्याद्री देवराई संस्था साठी सिने कलाकार व पर्यावरण प्रेमी सयाजी शिंदे बरोबर झाडे लावा, झाडे वाचवा , ह्याउपक्रमात व्यस्त असले तरी भटकंती करण्याची त्यांची इच्छा पूर्ण व्हावी ही शुभेच्छा ! अमोल यांचे सामाजिक , राजकीय,शैक्षणिक कार्य, व सह्याद्री देवराई संस्थेमार्फत महाराष्ट्रात करत असलेल्या निसर्ग संवर्धनाचे काम त्यांस निश्चितच नव्याने ऊर्जा देत राहील. आपले नाव सार्थ करणाऱ्या ,१९८० च्या फेब्रुवारीत जन्म असलेल्या अमोल सरांचा आज ११ तारखेला वाढदिवस आहे त्या निमित्ताने या मानवतावादी, निसर्ग प्रेमी व्यक्तीबद्दल लिहिण्याचा हा दुग्ध शर्करा योग मला मिळाला, ह्याचा आनंद वाटतो. त्यांचा आणखी एक गुण प्रखरतेने मला जाणवतो तो म्हणजे त्यांना केंव्हाही फोन केला तर ते ताबडतोब उचलतातच , मेसेज केला तरी सकारात्मक उत्तर तयार असते. २४ तास कामात व्यस्त असलेल्या अमोल सरांची ही तत्परता मी नेहमी अनुभवते, व त्यांच्याविषयी असलेला आदर अधिकच वाढतो ,अमोल सरांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा! त्यांची सर्व स्वप्ने पूर्ण होतील व देशात खऱ्या अर्थाने हरितक्रांती होईल ह्याची खात्री आहे, ,
*झाडे लावा झाडे जगवा* *सह्याद्री देवराई *ह्या मोहिमेत भाग घेण्याची इच्छा असणाऱ्या पर्यावरण प्रेमी मित्रासाठी अमोल जाधव सरांचा संपर्क मो. न. आहे 👇 ९८२३१९९५९८
प्रतिभा पिटके
अमरावती
९४२१८२८४१३
