दोडामार्ग येथे आज बुधवारी तातडीची बैठक; नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार
दोडामार्ग :
शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब हे बुधवार, दिनांक ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता दोडामार्ग येथील संपर्क कार्यालयात भेट देणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीदरम्यान नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच पुढील संघटनात्मक वाटचालीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.
या प्रसंगी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक तसेच सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
