कुडाळ / प्रतिनिधी :
“हा निकाल केवळ एका निवडणुकीचा निकाल नसून सामान्य माणसाच्या शक्तीचा विजय आहे,” असे भावनिक उद्गार नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य रुपेश अशोक पावसकर यांनी व्यक्त केले.
कोणत्याही मोठ्या राजकीय पाठबळाविना, केवळ मतदारांच्या प्रेमावर आणि विश्वासावर जिल्हा परिषदेच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. श्री देव कलेश्वर, माऊली, लक्ष्मीनारायण, सातेरी व प.पु. राऊळ महाराज यांच्या कृपेने हा विजय शक्य झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
प्रचारकाळात मतदारांनी दिलेला साधा चहाचा कप, पाठीवरची शाबासकीची थाप आणि “आम्ही तुझ्यासोबत आहोत” हा शब्दच आपल्याला लढण्याचे बळ देणारा ठरल्याचे पावसकर म्हणाले.
“मी एकटा लढत नव्हतो, तर विकासाची आस असलेला प्रत्येक माणूस माझ्या पाठीशी होता,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
जनतेला दिलेली ठाम ग्वाही
अपक्ष पण हतबल नाही: पक्षबंधन नसल्यामुळे पहिला शब्द मतदारसंघातील जनतेसाठीच असेल.
विकासाचा ध्यास: रस्ते, पाणी, शिक्षण व आरोग्य या मूलभूत प्रश्नांसाठी अहोरात्र प्रयत्न.
सदैव उपलब्ध: विजयाचा गुलाल उतरला तरी सुख-दुःखात धावून येणारा हक्काचा माणूस म्हणून कायम उपस्थिती.
“हे पद माझे नसून जनतेच्या सेवेचे साधन आहे. दिलेला विश्वास मी आयुष्यभर सार्थ ठरवेन,” असे सांगत त्यांनी सर्व मतदारांचे मनापासून आभार मानले.
