You are currently viewing पूर्वीसारखी पाखरं

पूर्वीसारखी पाखरं

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पूर्वीसारखी पाखरं*

 

पूर्वीसारखी पाखरं

दिसत नाही आता

झाडांची करता

कत्तल……!!🕊️

 

चिवचिवती पाखरं

फांदीवर घेतात झोके

मानवाने धोके

निर्मिले….!!🕊️

 

सिमेंटच्या जंगलात

पाखरांना नाही जागा

करतात त्रागा

मूकपणे….!!🕊️

 

पिल्लांना खाद्य

हिरवाई कुठे दिसेना

अन्न मिळेना

कुठे…..!!🕊️

 

पाखरं बिचारी

माणसांवर रुसून बसली

संख्या झाली

कमी…..!!🕊️

 

ओकंबोकं झाड

पाखराविना वाटे उदास

वळचण भकास

दिसली….!!🕊️

 

घरातील पाखरंही

दूरदेशी निघून गेली

माया आटली

त्यांचीही…..!!🕊️

 

प्रेमाची आपुलकीची

वनराई यावी बहरून

पाखरं फिरून

यावीत…..!!🕊️

 

☘️🌿🪵🪵🌱🕊️🌱🪵🪵

*अरुणा दुद्दलवार✍️*

प्रतिक्रिया व्यक्त करा