You are currently viewing गजानन महाराज

गजानन महाराज

*ज्येष्ठ कवयित्री सौ. कविता किरण वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गजानन महाराज* 

 

असे ब्रम्हांडनायक

होते योगी जीवनात

निरागस रुप दिसे

बाळबोध वर्तमान

 

भक्तिमार्ग योगमार्ग

कर्ममार्ग सांगितला

शेगावीचा योगीराणा

मुक्त जीवन जगला

 

अलौकिक गजानन

शेगावात प्रगटले

विदर्भात उद्धारिले

भक्तगण सुखावले

 

देशोदेशी भक्तगण

त्यांना करिती स्मरण

पायी मस्तक ठेविता

करी भक्तांचे तारण

 

महाराजांचा महिमा

दासगणुंनी लिहीला

भक्तिमय जगण्याचा

मार्ग त्यांनी दाखविला

 

सौ कविता किरण वालावलकर

दावणगिरी कर्नाटक

प्रतिक्रिया व्यक्त करा