*कणकवली तालुक्यात भाजपचे वर्चस्व*
*जि.प. -भाजप ६,शिवसेना १, अपक्ष १ :पं.सं. :भाजप १४, शिवसेना २…
कणकवली
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षाच्या युतीने वर्चस्व राखले आहे. फक्त फोंडाघाट जिल्हा परिषद गटामध्ये शिंदे शिवसेनेचे सदाशिव हळदिवे पराभूत झाले. मात्र तेथे भाजपचे बंडखोर राजन चिके हे विजयी झाले आहेत. एकूण निकालामध्ये जिल्हा परिषदेच्या ८ जागांपैकी भाजप ६, शिंदे शिवसेना १ आणि अपक्ष १ असे बलाबल आहे. तर पंचायत समितीच्या १६ जागांपैकी भाजप १४ आणि शिंदे शिवसेना २ असे संख्याबळ आहे. या निवडणुकीत ठाकरे शिवसेनेचा पुरता धुव्वा उडाला. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांनाही फारशी मते मिळालेली नाहीत.
कणकवलीत फोंडाघाट जिल्ह परिषद गटाची निवडणूक चुरशीची ठरली. ही जागा शिंदे शिवसेना पक्षाला देण्यात आली होती. मात्र शिंदे शिवसेनेचे सदाशिव हळदिवे यांचा भाजपचे बंडखोर राजन चिके यांनी ६०२ मतांनी पराभव केला. एकूणच यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप युतीने एकतर्फी विजय मिळविला. या विजयानंतर भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला आहे.
