जि.प.मध्ये नितीन राऊळ विजयी; पं.स.मध्ये सदाशिव राणे तर महेश धुरी बिनविरोध
सावंतवाडी : इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघातून अपक्ष उमेदवार नितीन राऊळ यांनी विजय मिळवला असून शिवसेनेचे शावियर फर्नांडिस यांना पराभव पत्करावा लागला आहे.
दरम्यान, इन्सुली पंचायत समिती गणातून सदाशिव राणे हे विजयी झाले आहेत. तसेच याच मतदारसंघातून भाजपचे महेश धुरी हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते.
