You are currently viewing माजगाव–मळगाव–चराठे गटात निकालांनी रंगले राजकारण
Oplus_16908288

माजगाव–मळगाव–चराठे गटात निकालांनी रंगले राजकारण

जि.प. माजगावमध्ये विक्रांत सावंत विजयी; पं.स.मध्ये जितू गावकर व उत्कर्षा गावकर यांची सरशी

सावंतवाडी :

माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपचे युवा नेते तसेच माजी मंत्री भाईसाहेब सावंत यांचे नातू विक्रांत सावंत यांनी तीन हजार मतांनी दणदणीत विजय मिळवला. ठाकरे शिवसेनेचे दिनेश सावंत यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला.

दरम्यान, मळगाव पंचायत समिती मतदारसंघातून अपक्ष उमेदवार जितू गावकर हे विजयी झाले असून चराठे पंचायत समिती मतदारसंघातून भाजपच्या उत्कर्षा गावकर यांनी विजय मिळवला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा