आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी एसटी प्रशासन झाले सज्ज !
जादा १३५ बसेसचे नियोजन!
कणकवली :
कोकणची काशी म्हणून ओळखली जाणारी आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची यात्रा ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागातून विविध मार्गावर जादा १३५ एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. १० फेब्रुवारी पर्यंत ही व्यवस्था करण्यात आली आहे. यात कुडाळ – आंगणेवाडी १५, वेंगुर्ला आगारासाठी कुडाळ – आंगणेवाडी १०, कसाल – हिवाळे – आंगणेवाडी ४, कसाल – खोटले – आंगणेवाडी ५, निरुखे – पांग्रड आंगणेवाडी ३, पणदूर – ओरोस आंगणेवाडी १ अशा कुडाळ आगारातून ३८ बसेस सोडण्यात येणार आहेत.
मालवण आगारातून मालवण – आंगणेवाडी १०, सावंतवाडी आगारासाठी मालवण – आंगणेवाडी १३, देवबाग तारकर्ली – आंगणेवाडी २, आनंदव्हाळ आंगणेवाडी, डांगमोडे – आंगणेवाडी, सर्जेकोट – आंगणेवाडी, मालोंड – आंगणेवाडी, देवली – वायरी – आंगणेवाडी, वराड – आंगणेवाडी, तळगाव – सुकळवाड – आंगणेवाडी, तिरवडे आंगणेवाडी, कट्टा आंगणेवाडी, धामापूर – आंगणेवाडी अशी प्रत्येकी एक बस, मसुरे आंगणेवाडी ४, चौके आंगणेवाडी २ अशा मालवण आगारातून ४१ बसेस सोडण्यात येतील.
कणकवली आगारातून २६, विजयदुर्ग आगारासाठी ५, सावंतवाडी आगारासाठी १०, असगणी – असरोंडी – आंगणेवाडी २ अशा ४३ बसेस कणकवली आगारातून सोडण्यात येणार आहेत.
देवगड आगारातून देवगड – आंगणेवाडी, हिंदळे – मुणगे – आंगणेवाडी प्रत्येकी २, आचरा – आंगणेवाडी ३, तोंडवली – तळाशील – आंगणेवाडी, कुडोपी आंगणेवाडी, आरे आंगणेवाडी, आचरा चिंदर बांदिवडे – आंगणेवाडी अशी प्रत्येकी १ अशा ११ बसेस देवगड आगारातून, तर पाट – परूळे – आंगणेवाडी आडारीमार्गे २ अशा वेंगुर्ला आगारातून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
