You are currently viewing पानगळ…

पानगळ…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्ज्वला सहस्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पानगळ….*

 

बघता बघता संपत आली,

थंडी शरद हेमंताची ll

पानगळ ही झाली तरूंची,

लागता चाहूल शिशिराची ll

 

वसंत येतो वाजत गाजत,

बनुनी सर्व ऋतुंचा राजा.ll

कोवळी पालवी झाडावरती,

दाखवी निसर्गाची ही मजा ll

 

पिवळी पाने झाडावरची,

उतरून येता अवनी वरती ll

नाजूक साजूक कोंब कोवळे,

दिसू लागती फांद्यांवरती ll

 

कुठे गान ते ऐकू येई,

कुहू कुहू त्या कोकिळ कंठीl

मिरवत येती सोनकिरणे ही

पहाट वाऱ्या संगे भोवती ll

 

आयुष्याच्या अंतकाळचा,

*पानगळ”‘ हा हळवा भाग ll

तोच घालीतसे जन्मा नंतर

नव सृजनाची पोपटी बाग ll

 

उज्वला सहस्रबुध्दे, पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा