You are currently viewing कलमठ–कणकवली येथे श्री गजानन महाराज प्रगट दिन उत्साहात साजरा

कलमठ–कणकवली येथे श्री गजानन महाराज प्रगट दिन उत्साहात साजरा

कलमठ–कणकवली येथे श्री गजानन महाराज प्रगट दिन उत्साहात साजरा

कणकवली
कलमठ–कणकवली येथे श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन आज अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी काकड आरतीने झाली. त्यानंतर श्रद्धा व भक्तीभावाने श्री सत्यनारायण महापूजा संपन्न झाली. दुपारी पुन्हा आरती घेण्यात आली. सायंकाळी भजने व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री आरतीनंतर सर्व भाविकांना झुणका–भाकरीचा प्रसाद देण्यात आला.
या पवित्र स्थळासाठी श्री. सुनील नाडकर्णी यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ १२ गुंठे जागा विनामूल्य दान दिली आहे. या जागेवर एक सुंदर आणि भक्तांना आकर्षित करणारे श्री गजानन महाराजांचे मंदिर साकारले असून, परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
आज या मंदिराला भेट देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व स्वामी भक्त श्री. अजित नाडकर्णी यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी सांगितले की, “शेगाव लांब असल्यामुळे अनेक भाविकांना तेथे जाणे शक्य होत नाही. त्यामुळे येथेच श्री गजानन महाराजांचे दर्शन घेण्याची सोय उपलब्ध झाल्याने भाविकांना मोठा लाभ होत आहे.”
संपूर्ण दिवस मंदिर परिसरात “गण गण गणांत बोते” या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले होते. परिसरातील तसेच पंचक्रोशीतील असंख्य भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
हा प्रगट दिन सोहळा धार्मिक एकोप्याचे, भक्तीचे आणि सामाजिक सहभागाचे उत्तम उदाहरण ठरला.

प्रतिक्रिया व्यक्त करा