“टोल का झोल” सिंधुदुर्गात रोखण्याची गरज!त्यासाठी विविध सामाजिक संस्था आणि देत असले तर राजकीय पक्षांचा पाठिंबा घेऊन आंदोलन छेडण्याची तयारी सिंधुदुर्गवासीयांनी करावी!!
सिंधुदुर्गातील नागरिकांसाठी भविष्यात टोल आकारला जाऊ नये यासाठी आजच संघटीत होण्याची गरज असल्याचे मत ॲड प्रसाद करंदीकर यांनी व्यक्त केले.
आता लवकरच मुंबई-गोवा हायवेवर टोल आकारायला सुरुवात होईल. तरीही यासंबंधी कोणतीही प्रतिक्रिया सिंधुदुर्गात उमटताना दिसत नाही. सिंधुदुर्गवासीय नेमक्या टोलप्रक्रियेबाबत आजही संभ्रमात आहेत. कोल्हापूरकरांनी “टोल देणार नाही” असे स्टिकर आपल्या गाड्यांना लावत अभूतपूर्व एकतेने टोलविरोधातले आंदोलन यशस्वी केले होते. आपण सिंधुदुर्गवासीयांनी जर आज आपल्या हक्काची भूमिका ठामपणे मांडली नाही, तर येणाऱ्या काळात गपगुमान टोलनाक्यावर मान झुकवून येताजाता टोल भरण्यातच आपण संपून जाऊ. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांवर कोणत्याही परिस्थितीत टोल आकारला जाणार नाही, ही आपली मागणी असायला हवी. त्यासाठी अन्यायाविरोधात लढण्याची धमक असलेल्या व्यक्ती आणि सामाजिक संस्थांनी या मागणीसाठी पुढे येऊन आंदोलनाची भूमिका घ्यायची आवश्यकता आहे. देत असतील त्या राजकीय पक्षांचा पण सक्रिय सहभाग घ्यायला हरकत नाही. या सर्वांनी आताच एका व्यासपीठावर येण्याची गरज आहे. यासाठी संघर्ष समिती म्हणून पुढाकार घेण्याची माझी तयारी आहे. सहभाग देऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी आपले मत अवश्य नोंदवावे असे आवाहन ॲड.प्रसाद करंदीकर यांनी केले आहे. आपले मत व अभिप्राय व्हाट्सअप क्रमांक : +91 70578 33777 वर नोंदवावे, असेही ते म्हणाले आहेत.