अमरावती :
येत्या 19 फेब्रुवारीला येणाऱ्या छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अमरावतीच्या डॉ.पंजाबराव देशमुख आय ए एस अकादमीच्या मिशन आयएएसने स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात तीन पुस्तके प्रकाशित करण्याचे ठरविले असून ही पुस्तके स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना विनामूल्य वितरित करण्यात येणार आहेत .अशी माहिती या संस्थेचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून दिलेली आहे.
मिशन आयएएसने यापूर्वी मी आयएएस अधिकारी होणार शेतकऱ्यांची मुले झालीत कलेक्टर विद्यार्थ्यांनोअधिकारी व्हा विद्यार्थिनीनो अधिकारी व्हा प्रेरणा स्पर्धा परीक्षेची स्पर्धा परीक्षेची एबीसीडी आनंदी राहा यशस्वी व्हा सक्सेस स्टोरीज ऑफ आयएएस ऑफिसर्स सारखी स्पर्धा परीक्षेला उपयोगी पडणारी पुस्तके प्रकाशित केलेली आहेत.
यावर्षी मिशन आय ए एसने येणा-या शिवजयंतीनिमित्त स्पर्धा परीक्षेची एबीसीडी हे सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना उपयोगी पडणारे पुस्तक प्रकाशित करण्याचा संकल्प केला असून हे पुस्तक मराठी बरोबरच हिंदी व इंग्रजी या तीन भाषेत प्रकाशित होणार आहे. शिवजयंतीनिमित्त तीन पुस्तकाचे प्रकाशन आयोजित करून मिशन आय ए एस ने शिवजयंती आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी करण्याचे ठरविले आहे.
प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003
