You are currently viewing आठवणींचे मोती…
Oplus_16908288

आठवणींचे मोती…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

आठवणींचे मोती…

 

किती मोकळी हवा ती

मम अंगणात होती

हलकेच जाग येई

शुभमंगल प्रभाती…

 

खाटेस खेटून खाट

आकाश चांदण्यात

मनसोक्त भिजलो आम्ही

त्या चांदण्या रसात…

 

झुळझुळ वाही वारा

उडवित पांघरूणे

होती मजा मजा ती

अन् खदखदून हसणे..

 

पैजा किती त्या हरलो

मोजत चांदण्यांना

संवाद मुक्त होता

चंद्रास पाहतांना..

 

ती खडी चांदण्यांची

सप्तर्षी नक्षत्रे किती ती

रात्रीस अंगणात

शिवली कधी न भीती..

 

ते मैत्र हरवले हो

चांदणे लयास गेले

किती सौख्यकारी दिन

हिरावून कोणी नेले…

 

आठवणीस कढ येती

भिजतात नेत्रपाती

रुंजी मनात माझ्या

गेली सुटून नाती…

 

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा