You are currently viewing कवीश्रेष्ठ सुरेश भट लोकांना जागविणारा कवी

कवीश्रेष्ठ सुरेश भट लोकांना जागविणारा कवी

 

येत्या शनिवार व रविवार दिनांक सात व आठ फेब्रुवारी रोजी कविवर्य सुरेश भटांच्या अमरावतीच्या मुळशी रोडवरील श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मध्ये अखिल भारतीय एल्गार गझल साहित्य संमेलन होत आहे. त्यानिमित्त गझल सप्ताह निमित्त हा विशेष लेख.

कविवर्य श्री सुरेश भट यांनी आपल्या गीतांमधून गझलांमधून लोकांना दाबण्याचे काम केले आहे त्यांनी मराठीमध्ये गझल या काव्य प्रकाराला प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेली आहे भट साहेबांनी गरजेचे कार्य फार मोठे आणि मोलाचे आहे लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या सर्वात मोठा दुवा म्हणजे भट साहेब गाणे त्यांना चांगलेच कळायचे चांगल्या सुरवातीला ते भरभरून दात द्यायचे हे उद्गार आहेत सुरेश वाडकर यांचे. आणि त्यात तथ्यंश देखील बराच आहे. सुरेश भटांनी खऱ्या अर्थाने या समाजाला जागवण्यासाठी आपली लेखणी वापरली आहे. उषा काल होता होता काळरात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली ही त्यांची कविता लोकांना जागवणारी कविता आहे. किंवा उगवला जर सूर्य तर मग हा असा अंधकार का म्हणविता जर तुम्ही राम तर मग हा रावणी दरबार का या शब्दात त्यांनी समाजाची वस्तुस्थिती मांडली आहे. साध्याच माणसाचा हा एल्गार येत आहे या शब्दात लोक जागे होत आहेत ही गोष्ट त्यांनी आपल्या कवितेतून बसलेतून मांडली आहे. आणि म्हणूनच सुप्रसिद्ध गायक श्री सुरेश वाडकर यांनी जे विधान केलेले आहे त्याला पुष्टी मिळते. सुरेश भटांच्या अशा कितीतरी कविता आणि गजला आहेत की त्यामध्ये त्यांनी लोकांना जागे करण्याचे काम केले आहे.

 

विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष राहिलेले व गोवा येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तसेच सुप्रसिद्ध वक्ते श्री राम शेवाळकर यांनी सुरेश भट हा दैवी देणं घेऊन आलेला एक प्रतिभा शालीक होता त्यांच्या शब्दांमध्ये संगीत होतं आणि होळीमध्ये लय होती त्यांच्या कवितेवर सूर मागावहून लोक झालेत पण अगोदरच त्यातील संगीत रसिकांना मोह घालू लागले होते शब्दांच्या साह्याने चित्रमय उभा करण्याचे फार मोठे सामर्थ्य या कवीच्या प्रतिमेमध्ये आहे. कविवर्य सुरेश भट जे काही लिहायचे ते अंतर्मनातून लिहायचे आत एक व बाहेर आहे हा एक प्रकार नव्हता. श्रीराम शेवाळकर यांनी म्हटल्याप्रमाणे खरेच आहे या प्रतिभाषा आली कवीला जि दिन मिळाली होती ती अप्रतिमच आहे . सुरेश भटांचा व्यासंग प्रचंड होता त्यांच्याकडे भरपूर शब्दकोश होते शिवाय त्यांना लयबद्धतेची संगीताची आभाळी होती त्यामुळे त्यांच्या कवितेमध्ये त्यांच्या गझलेमध्ये शब्दाच्या साह्याने चित्रमय जग उभा करण्याचे मोठं सामर्थ्य आपोआपच येत गेलं त्यासाठी त्यांचा पूर्वभ्यास व त्यांनी घेतलेल्या अनुभव निश्चितच कारणीभूत ठरले

सुप्रसिद्ध साहित्यिक आचार्य अत्रे यांच्या कन्या कवयित्री शिरीष पै यांनी कविवर्य सुरेश भट यांच्या कवितांच्या पुस्तकांचे संपादन केले आहे. त्या ओशोप्रेमी आहेत. सुरेश भटान विषयी त्या म्हणतात सुरेश भटांच्या गजरातून प्रवेश करता करता एखाद्या वनव्यात अडकल्यासारखे होते चोहोकडून ज्वाला प्रमाणे त्यांच्या गजलेच्या ओळी गिळून टाकायला येतात त्यांचे शब्द झपाटून टाकतात एका कमालीच्या संवेदनशील कवीचे संपूर्ण जगणे त्यांच्या कवितेतून उभे राहते.

प्रतिक्रिया व्यक्त करा