आडवली–मालडी मतदारसंघात सो. सोनाली सुनील घाडीगावकर यांना उत्स्फूर्त प्रतिसाद
मालवण :
आडवली–मालडी जिल्हा परिषद मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सो. सोनाली सुनील घाडीगावकर यांच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात किर्लोस येथील ग्रामदेवत श्री देवी पावणाई–रामेश्वर मंदिरात देवदर्शन घेऊन उत्साहात करण्यात आली.
मतदारसंघातील गावागावात जोमाने प्रचारयंत्रणा राबवली जात असून किर्लोस गावातून बहुमताचे मतदान महायुतीच्या पारड्यात पडेल, असा ठाम विश्वास शिवसेना जिल्हा सचिव गजानन बाक्रे यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना बाक्रे म्हणाले की, जिल्हा परिषद सदस्य म्हणून सो. सोनाली घाडिगावकर यांचे सिलेक्शन स्वतः श्री देव रामेश्वराने केले आहे. या निवडणुकीत ज्येष्ठ व तरुण पिढी तनमनाने प्रचारात सहभागी होत असून शिवसेनेची ध्येयधोरणे आणि विकासाचा विचार घराघरांत पोहोचत आहे. दुसरीकडे विरोधी पक्ष केवळ सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन ‘विश्वासाची सफर’ करत आहेत; मात्र मतदार त्यांचे स्वप्न धुळीस मिळवतील. ९ तारखेला विजयाचा गुलाल शिवसेना–महायुतीच उधळणार, हे आता निश्चित झाले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मोठ्या संख्येने शक्तिप्रदर्शन करत डोअर-टू-डोअर प्रचारातून मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला. महिला व ज्येष्ठ नागरिकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता सो. सोनाली सुनील घाडीगावकर या ऐतिहासिक मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी उमेदवार सो. सोनाली घाडीगावकर, सुनील घाडीगावकर, शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत, सुशांत घाडिगावकर, बाळा लाड, अभिमन्यू लाड, सुनील सदाशिव घाडीगावकर, विनोद भावे, विलास भावे, माजी पोलिस पाटील प्रकाश भावे, गुरुनाथ चव्हाण, प्रकाश किर्लोस्कर, सागर घाडीगावकर, कमलेश घाडीगावकर, संतोष भावे, हर्षद घाडीगावकर, प्रशांत परब यांच्यासह महायुतीचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
