नवीन कुर्ली गावात अनंत पिळणकर व कीर्ती एकावडे यांचा घरोघरी जनसंपर्क
कणकवली :
फोंडा जिल्हा परिषद मतदारसंघातील लोरे पंचायत समिती अंतर्गत लोरे व वाघेरी गावांमध्ये फोंडा जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार श्री. अनंत पिळणकर तसेच लोरे पंचायत समितीच्या उमेदवार सौ. कीर्ती एकावडे यांनी नवीन कुर्ली गावात जोरदार प्रचार केला. घरोघरी भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधत विकासाचा अजेंडा मांडण्यात आला.
या प्रचार दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते सुंदर पारकर गुरुजी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभाग प्रमुख सिद्धेश राणे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे रमेश राणे, लोरे शाखाप्रमुख निलेश राणे, घोणसरीचे माजी सरपंच कृष्णा एकावडे, घोणसरी ग्रामपंचायत सदस्य सचिन मिस्त्री, तसेच विशाल राणे, प्रीतम राणे, दर्शन मराठे, प्रशांत सुतार, वैभव तावडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक विकास, मूलभूत सुविधा आणि ग्रामविकासाच्या मुद्द्यांवर मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र या प्रचारादरम्यान दिसून आले.
