*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*चहासोबतची..हरवलेली ..मैत्री..!!*
काय करून रायला..बे
चाय पिऊन राहिलो..बे
काय..करतोस..रे
चहा..घेत आहे..रे
विदर्भ नागपूर पुण्याचं..नात
राज्यभराचं माझं मित्रांचं..नात
आजवर ह्दयांत जपलं
आयुष्य घडवण्याच्या नादात
चहाला गहाण ठेवलं
कपाला बिलगणारी बोटं
कधीकधी आठवणीतून थरथरतात
एकेकाळचे जिवलग साथी
चहाच्या घोटाघोटात आठवतात
चेहरे.. बेशरम..हसरे..तेच
चहासोबत वेगवेगळे दिसतात
तळाला ….चहा पोचताचं
यजमानपद स्वर्गातून स्विकारतात
धुंडाळतो..आजवर जे.. ते…कधीच हरवलं नव्हतं
गेली ती..माझी चहावाली माणसं
त्यांना मी ..जीवापाड जपलं होतं
विनोदाची झालर..कारूण्याला देत
चहाचं जीवनमान उंच करतो
फुर्रफुर्र..दैवी आवाजाने..तोचं
घोटाघोटात माझी माणसं जोडतो
बाबा ठाकूर
