You are currently viewing कुडाळ येथील श्री गवळदेव मंदिराचा २८ वा वर्धापनदिन

कुडाळ येथील श्री गवळदेव मंदिराचा २८ वा वर्धापनदिन

५ ते ७ फेब्रुवारीला विविध कार्यक्रमांनी होणार साजरा

कुडाळ :

कुडाळ येथील श्री गवळदेव मंदिराचा २८ वा वर्धापनदिन सोहळा ५ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ५ रोजी सायंकाळी ७ वाजता ‘श्रीं’ची आरती, रात्री ८ वाजता कै सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री देव कलेश्वर दशावतार मंडळ (नेरुर) चे ‘वेडा चंदन’ नाटक होईल ६ रोजी सकाळी १० वाजता चित्रकला स्पर्धा (पहिली ते चौथीच्या मुलांसाठी मर्यादित), दुपारी ३ वाजता लहान मुलांचे कार्यक्रम, सायंकाळी ४.३० वाजता. महिलांसाठी विविध कार्यक्रम व स्पर्धा, ७ वाजता ‘श्रीं’ची आरती ७.३० वाजता सद्गुरु वारकरी मंडळ (कुडाळ) चे भजन,रात्री ९ वाजता नाद म्युझिक अॅकॅडमीचा संगीत कार्यक्रम ‘नाद संध्या’ हांईल. ७ रोजी सकाळी ६.३० वाजता नामस्मरण व ‘श्रीं’ची नित्यपूजा, ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत लघुरुद्र, दुपारी १२ वाजता महाआरती, १२.३० ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत महाप्रसाद, ५ वाजता हरिपाठ (सद्गुरु वामनराव पै), ७ वाजता ‘श्रीं’ची आरती,रात्री ८ वाजता ‘श्री’ची पालखी मिरवणूक, ९ वाजता खानोलकर दशावतार मंडळ (खानोली) चे ‘छत्रदान’ अर्थात पुण्याश्री’ नाटक होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन श्री गवळदेव मित्रमंडळ,कुडाळच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा