You are currently viewing आरोंदा मतदारसंघात सुधा कवठणकर यांची प्रचारात आघाडी
Oplus_16908288

आरोंदा मतदारसंघात सुधा कवठणकर यांची प्रचारात आघाडी

शिंदे शिवसेनेच्या उमेदवाराला कार्यकर्ते व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; विजयाची शक्यता बळावली

सावंतवाडी/ आरोंदा :

आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघात शिंदे शिवसेनेच्या उमेदवार सुदन ऊर्फ सुधा कवठणकर यांनी प्रचारात ठोस आघाडी घेतली असून मतदारसंघात त्यांच्या विजयाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. कार्यकर्त्यांची मजबूत संघटना त्यांच्या पाठीशी उभी असून आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाप्रमुख संजू परब यांचा त्यांना भक्कम पाठिंबा मिळत आहे.

सध्या सुधा कवठणकर यांनी घरोघरी भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे. विकासाच्या मुद्द्यांवर त्यांनी मांडलेली भूमिका मतदारांना भावत असून नागरिकांकडून त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

दीर्घकाळ रखडलेल्या विकासकामांबाबत नागरिकांमध्ये नाराजी असून “आता परिवर्तन आवश्यक आहे” अशी भावना ठळकपणे व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत आरोंदा मतदारसंघात सुधा ऊर्फ सुधा कवठणकर यांच्या विजयाचे संकेत अधिक बळकट होत असल्याचे चित्र आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा