*मसुरे देऊळवाडा येथे 5 फेब्रुवारी रोजी ‘अखेरचा सवाल ‘ नाट्यप्रयोग!
मालवण
श्री समर्थ बागवे महाराज संस्थान मसुरे देऊळवाडा दत्त मंदिर येथे ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६.०० वा. श्री सत्यनारायण आरती व तीर्थप्रसाद,
सायंकाळी ७ वा. ते ९ वा. भजने, रात्रों ठीक १०.०० वा. त्रिमूर्ती नाट्यमंडळाचा “अखेरचा सवाल ” हा नाट्यप्रयोग होणार आहे. लेखक वसंत कनेटकर, निर्माता श्री. महेश बागवे,सहसूत्रधार – श्री. शाम बागवे,
सूत्रधार – श्री. प्रकाश बागवे, रंगभूषा – श्री. संदेश मसुरकर,
प्रकाश योजना व ध्वनी संकलन दिग्दर्शक श्री. चंद्रकांत परब, पार्श्वसंगीत श्री. दिनेश मेस्त्री, बाळ मेस्त्री वेरली नेपथ्य – कांबळी बंधू रेवंडी तसेच
त्रिमूर्ती नाट्यमंडळाचे यशस्वी कलाकार सोबत सुजाता शेलटकर, योगिता शेलटकर, अर्चना देऊलकर भूमिका साकारणार आहेत. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.
