*काव्यप्रेमी महाराष्ट्र समूहाचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी भूमिपुत्र वाघ लिखित अप्रतिम लेख*
*शिवपुत्र संभाजी महाराज यांस*
*जगतातील तमाम बहुजन, शिवप्रेमी यांच्याकडून मानाचा मुजरा राजे.*
महाराज, आज हे पत्र आवर्जून आपल्या सेवेत विनम्रपणे समर्पित करतो आहे.
महाराज आपल्या इतिहासाला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत. इतक्या प्रदीर्घ कालखंडानंतरही आज प्रत्येक माणसांच्या श्वासासोबत आपण आम्हा बहूजनांच्या,मावळ्यांच्या रोमा रोमा मध्ये संचारत आहात.
रयतेसाठी,शिवसम्राज्यासाठी,
आपण केलेलं बलिदान आजही आपल्या कार्य कर्तुत्वाची, विचाराची आणि महाराजांनी मिळवलेलं साम्राज्य स्वराज्य स्वराज्य रक्षण करत असताना आपण केलेल्या त्यागाची साम्राज्याची साक्ष देत आहे……
अजरामर झालेला आपल्या रक्ताचा थेंब ना थेंब ईथल्या माय भूमीमध्ये पुन्हा पुन्हा रोमांकित होतो आहे. अंकुरतो आहे.फुलतो आहे…….
फक्त शंभूराजे म्हटलं तरी अंग अंग शहारते आहे.डोळ्याच्या कडान कडा आपसूक ओलावतात.आणि स्पुरन चढते. बाहुबलात रक्त
सळसळते संचारते मुठी ओळल्या जातात.कंठातून आकाशाला गवसनी घालणारा बुलंद आवाज बाहेर पडतो.
छत्रपती संभाजी महाराज की sssssssss जय ssss जय ssss जय…
महाराज आपल्या जयघोषाने अंबर निनादून जाते. निळं आकाश भगवमय होऊन जाते.महाराज नक्की सांगायला अभिमान वाटतो.आज ज्या औरंग्यानं इथल्या फितूराना बरोबर घेऊन आपली हत्या केली. त्याच औरंग्याचे थडगं इथल्या मातीत शरमेन झुकलं आहे. नुसतं झुकलंच नाही तर ते आपणास, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज,यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या प्रत्येक गडकिल्ल्यास नतमस्तक होऊन शिरमेंदही झालं आहे.केलेल्या चुकांची साडेतीनशे वर्ष झालं थडगं याचना करत आहे.ज्याला बाप कळला नाही. भाऊ समजला नाही. बहीण बाळं कळली नाहीत.सरसकट सत्तेसाठी त्यांची कत्तल करणारा निर्दयी निष्ठूर दगाखोर याच महाराष्ट्रातल्या मातीत इथेच गाडला गेला.मराठ्यांचे साम्राज्य नेस्तनाबूत करतो.अशी शपथ घेतलेला औरंगजेब तो याच मातीतून परत गेलाचं नाही. आणि परतही जाऊ दिला नाही. ह्या मराठ्यांच्या शिवसम्राज्याने औरंग्याचे अस्तित्व समाप्त केलं.आता तेच थडग चुकीची क्षमा मागत आहे राजे.याचना करत आहे. त्यालाही आज चुकीसाठी क्षमा मागायची इच्छा झालीय. राजे आपल्या माहितीसाठी नक्की सांगायला मला आवडेल. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज या नावाची घोषणा केली होती.आज तेही अस्तित्वात नाहीत.परंतु त्यांची आठवण आल्या वाचून रहात नाही.आज औरंगजेबचे नामोनिशान मिटल आहे. आणि त्याच जिल्ह्याला, शहराला छत्रपती संभाजी नगर असे म्हणजे आपले नाव दिलं आहे.त्यानंतर आज आपला स्मृतिदिन आम्ही आपल्या आठवणीत पूर्ण जगभर साजरा करतो आहे.
महाराज सांगायला अभिमान वाटतो. आज प्रत्येक घराघरावरती आपल्या स्मृतीची,आपल्या त्यागाची आठवण म्हणून भगवा झेंडा आकाशाला गवसणी घालतो आहे. उभा हिंदुस्तान भगवामय झालेला आहे.आपला विचार,आपला त्याग,आमच्या रोमारोमा मध्ये भिनला आहे.आज गड किल्लेही छत्रपती संभाजी महाराज की जय ची घोषणा देत आहेत. ते आपल्या कार्य कर्तुत्वाची, आणि त्यागाची साक्ष देत आहेत.
राजे आपल्या त्यागाची, बलिदानाची निशाणी अजरामर झाली.
*राजे आपण दिलेले बलिदान व्यर्थ गेललं नाही.तर ते अजरामर झालं ….*
*जय हो शंभुराजे*
*अजरामर हो शंभूराजे*.
लेखक.
भूमीपुत्र वाघ.
9172972482
शिवधर्म प्रचारक महाराष्ट्र
