You are currently viewing आंबोलीत उबाठाला मोठा धक्का! संजू परब यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
Oplus_16908288

आंबोलीत उबाठाला मोठा धक्का! संजू परब यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

पक्ष निरीक्षक राजेश मोरे यांच्या हस्ते प्रवेश; आंबोली जिल्हापरिषद गटातील उबाठाचे पदाधिकारी-कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

सावंतवाडी / आंबोली :

आंबोली परिसरात उबाठाला मोठा राजकीय धक्का बसला असून, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संजू परब यांच्या नेतृत्वाखाली उबाठा पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्ष निरीक्षक राजेश मोरे यांच्या हस्ते हा प्रवेश पार पडला.

आंबोली जिल्हापरिषद गटातील उबाठाचे उपविभाग प्रमुख बुधाजी पाताडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य महेश पावसकर, निधी गुरव, राजा गुरव, रामचंद्र आमडोस्कर, निखिल गुरव, जीजी राऊत, गोविंद जाधव, संजय राऊत, सुनील राऊत, शोभना राऊत, रिया पाताडे, संजय पडते, बाबुराव शेळके, लक्ष्मण जाधव, कांता गुरव, अनिल मेस्त्री, केशव जाधव आदी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्यासोबत पक्ष निरीक्षक राजेश मोरे, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, पंचायत समितीचे उमेदवार मायकल डिसोजा, विभाग प्रमुख विलास गावडे, माजी सरपंच जगन्नाथ गावडे, अरुण गावडे, नंदू गावडे, विशाल बांदेकर, उत्तम नार्वेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

या प्रवेशामुळे आंबोली परिसरात शिवसेनेची ताकद अधिक मजबूत झाली असून उबाठा गटाला मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा