You are currently viewing व्याकुळ स्पंदने

व्याकुळ स्पंदने

*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*व्याकुळ स्पंदने*

〰️〰️〰️〰️〰️

या संवेदना शुष्क बोथट आता

भाव शब्दही निरर्थक जाहले

 

कसे आळवावे तरी शब्दांना

जे आज शब्दांच्या पलिकडले

 

व्यक्तीपरत्वे वेगळाले जग हे

मना एकटेपण जाणवू लागले

 

ध्यास जगण्याचा जरी जीवाला

जगावे कुणासाठी हे न कळले

 

स्पंदने जाहली व्याकुळ जरी

तरी अंती नाही काही गवसले

 

हे जरी साक्षी सत्य निखालस

शोध अंतरीचे नाही संपलेले

 

मानूनी दान ते दयाघनाचे

जपावे क्षणक्षण ओंजळीतले

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

*©️वि.ग.सातपुते(भावकवी)*

प्रतिक्रिया व्यक्त करा